Join us

Kharif Season : खरीप पेरणीपूर्वी मोठी कारवाई; २४७ कृषी निविष्ठांचे नमुने तपासणीसाठी पाठविले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:34 IST

Kharif Season : खरीप हंगाम (Kharif Season) तोंडावर असताना, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून अकोला जिल्ह्यातील २८१ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून, २४७ नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.(Kharif Season)

Kharif Season : खरीप हंगाम काही दिवसांत सुरू होणार असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी सुरू केली आहे. यात अनेक गैरप्रकार समोर येत असतात. त्यामुळे अकोला येथे नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली. (Kharif Season) 

याच काळात अप्रामाणिक विक्रेत्यांकडून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कृषी विभाग सतर्क झाला असून अकोला जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी मोहीम राबवली जात आहे.(Kharif Season) 

या मोहिमेंतर्गत कृषी विभागाच्या भरारी पथकांमार्फत ६ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यातील २८१ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली असून, २४७ नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.(Kharif Season) 

काय नमुने घेतले?

बियाणे : १६४ नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले

खते : ७३ नमुने छत्रपती संभाजीनगर प्रयोगशाळेत पाठविले

कीटकनाशके : १० नमुने अमरावती प्रयोगशाळेत पाठविले

कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुन्यांची तपासणी लवकरच पूर्ण होणार असून, गुणवत्तेवर तडजोड करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय विक्री केंद्रांची संख्या

तालुकाबियाणेखतेकीटकनाशके
अकोला४७२२१०२२७
अकोट३७७१७०१४३
बाळापूर३०११०७१०६
मूर्तिजापूर२०६७५६६
बार्शीटाकळी२४०१०३९४
तेल्हारा२४७१००९३
पातूर१५१७७७५

तपासणीमागील हेतू

* खरेदीसाठी गर्दी करत असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे.

* खराब दर्जाचे बियाणे, नकली खते व कीटकनाशकांवर प्रतिबंध घालणे.

* खरीप हंगामात योग्य दर्जाचे निविष्ठा उपलब्ध करून देणे

हे ही वाचा सविस्तर : Fertilizers and Seeds Update : खते-बियाण्यांवरून शेतकऱ्यांची फरफट; बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई होणार? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीखतेअकोला