प्रशांत तेलवाडकर
सामान्य गव्हाचा दर २५ ते ३५ रुपये किलो असताना, शहरात एक प्रकारचा गहू तब्बल १०० रुपये किलोने विकला जात आहे. एवढा महाग गहू म्हणजे 'खपली गहू' किंवा 'इमेर गहू'. आश्चर्य म्हणजे, या गव्हाची पोळी खाणाऱ्यांची आरोग्य सजगता वाढू लागली आहे. (Khapli Wheat Benefits)
खपली गहू म्हणजे काय?
'खपली गहू' ही प्राचीन जात (Ancient Wheat Variety) असून हजारो वर्षांपासून लागवडीखाली आहे.
आधुनिक गव्हाच्या तुलनेत या गव्हावर प्रक्रिया कमी होते. त्यामुळे त्यातील नैसर्गिक तंतू (फायबर), जीवनसत्त्वे आणि खनिजे अधिक प्रमाणात टिकून राहतात. हा गहू बहुतेकवेळा दगडी गिरणीवर दळला जातो, ज्यामुळे पोषक घटक नष्ट होत नाहीत.
आरोग्यदायी फायदे
नेहमीच्या गव्हात ग्लुटेनचे प्रमाण सुमारे १० ते १४ टक्के असते, जे पचायला जड असते. तर खपली गव्हात फक्त ७ ते ९ टक्के ग्लुटेन असते आणि तेही सहज पचणारे प्रकारचे.
गहू 'या' आजारांमध्ये उपयुक्त ठरतोय
मधुमेह (Diabetes)
हृदयरोग (Heart Disease)
स्थूलता (Obesity)
कॅन्सर प्रतिबंधातही उपयोगी
कोठे उत्पादन होते?
खपली गव्हाचे उत्पादन मुख्यतः पुणे, बारामती, सांगली, सातारा या भागांत केले जाते.
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात, तसेच गुजरात आणि कर्नाटकातही या गव्हाची लागवड केली जाते.
महाराष्ट्र: खपली गहू
गुजरात: पोपटिया गहू
कर्नाटक: सांबा गहू
खपली गव्हाच्या पदार्थांवर प्रेम
खपली गव्हाच्या पोळ्या केवळ चवदारच नाहीत, तर पचायलाही हलक्या असतात. याशिवाय खीर, लापशी यांसारखे पदार्थही या गव्हापासून खास बनतात.
'खपली' या शब्दाचा अर्थच कुरकुरीत कवच असलेला असा आहे, म्हणूनच या गव्हाला हे नाव मिळाले आहे.
किंमत आणि मागणी
साधारण गव्हाचा दर २५ ते ३५ रुपये किलो असताना, खपली गहू ८० ते १०० रुपये किलोपर्यंत विकला जातो. महिन्याला २५ ते ५० क्विंटल इतकी विक्री शहरात होते. त्याची विक्री मर्यादित असली तरी, ज्यांना त्याचे फायदे माहित आहेत, ते ग्राहक हा गहू आवर्जून विकत घेतात.
'एमपी शरबती' लोकप्रिय, पण खपलीला मागणी वाढते
सध्या मध्यमवर्गीय कुटुंबांत एमपी शरबती गहू लोकप्रिय आहे. मात्र, आरोग्य जाणिव वाढल्याने खपली गव्हाकडे लोकांचा कल वाढतोय. डायटिशियन आणि फिटनेस एक्स्पर्टदेखील या गव्हाचा वापर सुचवत आहेत.
आजच्या फास्टफूड युगात लोकांना आरोग्यपूर्ण अन्नाची गरज अधिक जाणवते आहे. अशा काळात, पारंपरिक पण पौष्टिक 'खपली गहू' पुन्हा एकदा थाळीत स्थान मिळवत आहे. महाग असला तरी आरोग्यासाठी हा गहू किंमत वसूल ठरत आहे, असे नागरिक सांगतात.
हे ही वाचा सविस्तर : अंजीर : 'फुले राजेवाडी' कोरडवाहू भागासाठी वरदान वाचा सविस्तर
Web Summary : Khapli wheat, priced at Rs. 100/kg, is gaining popularity among health-conscious citizens. This ancient grain, rich in fiber and low in gluten, is favored for its easy digestibility and health benefits, including cancer and diabetes prevention. It's grown in Maharashtra, Gujarat and Karnataka.
Web Summary : ₹100/किलो पर मिलने वाला खपली गेहूं स्वास्थ्य के प्रति जागरूक नागरिकों के बीच लोकप्रिय हो रहा है। फाइबर से भरपूर और ग्लूटेन में कम होने के कारण, यह प्राचीन अनाज अपनी आसान पाचन क्षमता और कैंसर और मधुमेह की रोकथाम सहित स्वास्थ्य लाभों के लिए पसंद किया जाता है। यह महाराष्ट्र, गुजरात और कर्नाटक में उगाया जाता है।