Join us

Agriculture News : मोहाची फुले गोळा करतांना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वनविभागाचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:41 IST

Agriculture News : सद्यःस्थितीत पानगळीला सुरुवात झाली असल्याने मोहफूल (Moh Fule) संकलनाची चाहूल लागली आहे.

भंडारा : मागील वर्षीप्रमाणेच यंदा देखील काही भागात मोह फुलाचे (Moh Fule) प्रमाण कमी आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भंडारा जिल्ह्यात मोहफूल संकलनाला सुरुवात होते. सद्यःस्थितीत पानगळीला सुरुवात झाली असल्याने मोहफूल संकलनाची चाहूल लागली आहे. मात्र मोहफूल संकलन करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) काही भागात मोहफुलांच्या झाडांना मोठ्या प्रमाणात कळ्या येण्यास सुरुवात झाली असून, लवकरच मोहफूल हंगामाला सुरुवात होणार आहे. मोहफूल जास्त प्रमाणात मिळावे, यासाठी ग्रामीण भागातील नागरिक पहाटेच्या अंधारातच जंगलात जातात. परंतु, पहाटे अंधारात मोहफूल संकलनाला (Mohful sanklan) जाणे धोक्याचे ठरू शकते. अशावेळी योग्य ती काळजी न घेतल्यास मानव-वन्यजीव संघर्ष होऊन जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अशी घ्या काळजी 

  • नागरिकांनी मोहफूल संकलन करताना आजूबाजूला शक्यतो जास्त वेळ खाली वाकून मोहफूल गोळा करू नये. 
  • एकट्याने जंगलात जाऊ नये, जंगलात चौफेर नजर असावी. 
  • म्हातारे व कमजोर व्यक्तींनी जंगलात जाणे टाळावे. 
  • जंगलात वाघ दिसल्यास सर्वांनी आरडाओरड करून तिथून निघून जावे. 
  • पानवठा, तलावाच्या जवळपास सावधगिरीने जावे. 
  • महिनाभर हमखास रोजगार देणारा हा हंगाम असला तरी, यंदाही नागरिकांना वन्यप्राण्यांच्या दहशतीतच मोहफूल संकलन करावे लागणार आहे.

 

वाघ, बिबट्यांपासून सतर्क राहावेवन परिक्षेत्र लाखनी (एफडीसीएम) अंतर्गत कार्यक्षेत्र किटाडी व मांगली (बांध) बीटमधील वनक्षेत्रात वन्यप्राणी व हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. दिवसेंदिवस मानव व वन्यप्राणी संघर्षाच्या घटना घडत आहेत. पहाटे तीन वाजेपासून अनेकजण जंगलात व जंगलालगतच्या शेतशिवारात मोहफुलांचे संकलन करतात. अशावेळी पट्टेदार वाघांसह बिबट व अस्वलांचे हल्ले होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी अंधारात मोहफूल संकलन करणे टाळणे हेच हिताचे ठरेल.

मोहफूल संकलन करताना, तसेच तेंदू घटकांमध्ये तेंदूपानांच्या रोपट्यांची छाटणी करताना नागरिकांनी आपल्या जीविताची काळजी घ्यावी. जंगलात आग लागेल, असे कोणतेही कृत्य करू नये. मोहफुले अधिक मिळावी, म्हणून एकट्याने जंगलात सैरावैरा भटकू नये. तीन-चारच्या गटाने आवाज करीत जावे. मोहफूल झुडपात असतील, तर सावध होऊनच झाडाजवळ जावे.- राहुल लोणारे, क्षेत्र सहायक, वन परिक्षेत्र (एफडीसीएम), लाखनी

Bahava Tree : बहाव्याचे झाड माहितीय का? या झाडांच्या फुलांची भाजी कशी करतात? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीभंडाराशेतकरी