Kapus Nondani Last Date : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून हमीभावाने (MSP) कपाशी विक्रीसाठी नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. (Kapus Nondani Last Date)
यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असलेली मुदत शासनाने वाढवून १६ जानेवारी २०२६ पर्यंत केली होती. आता ही वाढीव मुदत संपत असून, ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Kapus Nondani Last Date)
'कापास किसान' ॲपवर नोंदणी अनिवार्य
हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना 'कापास किसान' (Cotton App) या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणी करणे बंधनकारक आहे.
कापूस खरेदी केंद्रांवर किमान आधारभूत दराने (MSP) विक्रीसाठी नोंदणी केल्याशिवाय कापूस स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड
बँक खाते (आधारशी लिंक असलेले)
शेतजमिनीची माहिती असणे आवश्यक आहे.
मुदतवाढ का देण्यात आली?
२०२४-२५ च्या कापूस हंगामात
खुल्या बाजारात कापसाचे दर घसरले,
अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे वेळेत नोंदणी करता आली नाही,
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने कापूस विकण्याऐवजी हमीभावावर विक्री करण्याची संधी मिळाली.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
या मुदतवाढीमुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शासनाच्या खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीचा मार्ग खुला झाला आहे. मात्र, आज शेवटचा दिवस असल्याने नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे किमान आधाभूत किंमत( MSP) चा लाभ मिळणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाचे आवाहन
कापूस खरेदी केंद्रे, कृषी विभाग आणि संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ज्यांनी अद्याप कापूस नोंदणी केलेली नाही त्यांनी आजच 'कापास किसान' ॲपद्वारे नोंदणी करून घ्यावी. अंतिम मुदतीनंतर नोंदणी स्वीकारली जाणार नाही.
हमीभावाने कापूस विक्री करण्याची ही अंतिम संधी असून, आजच नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना खासगी बाजारावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी वेळ न दवडता नोंदणी पूर्ण करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Web Summary : Cotton farmers, today is the last day to register for MSP. Registration is mandatory via the 'Kapas Kisan' app. Extension was granted after court intervention due to low market rates. Don't miss this final opportunity!
Web Summary : कपास किसानों, एमएसपी के लिए पंजीकरण करने का आज अंतिम दिन है। 'कपास किसान' ऐप के माध्यम से पंजीकरण अनिवार्य है। कम बाजार दरों के कारण अदालत के हस्तक्षेप के बाद विस्तार दिया गया। इस अंतिम अवसर को न चूकें!