Join us

Kapus Kharedi : कापूस खरेदीचा मुहूर्त ठरला; एमएसपीवर कापूस विक्रीची संधी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:33 IST

Kapus Kharedi : भारतीय कापूस महामंडळाचा (CCI) कापूस खरेदीचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस उत्पादकांना दिलासादायक बातमी आहे. वाचा सविस्तर (Kapus Kharedi)

Kapus Kharedi : राज्यात भारतीय कापूस महामंडळाचा (CCI) कापूस खरेदीचा मुहूर्त ठरला आहे. १५ ऑक्टोबरपासून किमान आधारभूत किंमतीवर कापूस खरेदीस प्रारंभ करणार आहे. (Kapus Kharedi)

मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कपास किसान मोबाईल अॅपवर ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. अंतिम तारीख ३० सप्टेंबर असल्याने शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करून आपल्या कापसाला योग्य दर मिळवावा.

हंगाम २०२५-२६ मध्ये भारतीय कापूस महामंडळ (CCI) मार्फत किमान आधारभूत किंमतीने (MSP) कापूस खरेदीस प्रारंभ होणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रशासनाने खरेदीपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. 

या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 'कपास किसान' मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असल्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम यांनी जाहीर केले आहे.

खरेदी केंद्रे आणि वेळापत्रक

जिल्ह्यातील अनसिंग (ता. वाशिम), मंगरुळपीर, कारंजा लाड आणि मानोरा या चार केंद्रांवर कापूस खरेदी १५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे.

नोंदणीसाठी अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली असून, सध्या शेतकऱ्यांकडे फक्त १४ दिवसांचा अवधी शिल्लक आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

जमीन नोंदणी (हंगाम २०२५-२६ चे ऑनलाईन अद्ययावत दस्तऐवज)

महसूल प्राधिकरणाची प्रमाणित पिक लागवड नोंद (२०२५-२६)

वैध आधार कार्ड

पासपोर्ट साईज फोटो

नोंदणी प्रक्रिया

मोबाईलवर 'कपास किसान' अॅप डाउनलोड करा.

अॅप उघडून 'न्यू रजिस्ट्रेशन' वर क्लिक करा.

मोबाईल क्रमांक टाकून ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करा.

नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आदी मूलभूत माहिती भरा.

गावाचे नाव, जिल्हा, पिक क्षेत्रफळ, जमिनीचा तपशील नमूद करा.

सातबारा उतारा किंवा जमीन नोंदणी क्रमांक टाका.

किती एकरावर कापूस घेतला आहे आणि अपेक्षित उत्पादन (क्विंटलमध्ये) नमूद करा.

बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड भरून सबमिट करा.

महत्त्वाची सूचना

शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी नोंदणी पूर्ण करून एमएसपीचा (MSP) लाभ घ्यावा. नोंदणीशिवाय खरेदी केंद्रावर कापूस विक्री करता येणार नाही, असे भारतीय कापूस महामंडळ व जिल्हा उपनिबंधकांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : CCI Cotton Farmers App : सीसीआयचे 'कापस किसान' ॲप; शेतकऱ्यांसाठी कापसाची ऑनलाइन नोंदणी सुरू

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती