Join us

Kapus Kharedi : हमी केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना टेक्नोसॅव्ही व्हावे लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:57 IST

Kapus Kharedi : कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना यावर्षी तंत्रज्ञानाची नवी परीक्षा द्यावी लागत आहे. 'कपास किसान' ॲपवरील नोंदणीतील चुका आणि हमी केंद्रावर स्लॉट बुकींगच्या नियमांमुळे विक्री प्रक्रिया किचकट बनली आहे. परिणामी, हमीदराने विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांपुढे नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. (Kapus Kharedi)

Kapus Kharedi : कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना यावर्षी तंत्रज्ञानाची नवी परीक्षा द्यावी लागत आहे. 'कपास किसान' ॲपवरील नोंदणीतील चुका आणि हमी केंद्रावर स्लॉट बुकींगच्या नियमांमुळे विक्री प्रक्रिया किचकट बनली आहे. परिणामी, हमीदराने विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांपुढे नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.(Kapus Kharedi)

भारतीय कापूस महामंडळाने (CCI) यंदा महाराष्ट्रात १६८ कापूस खरेदी केंद्रे स्थापन केली असून, त्यापैकी ८९ केंद्रे विदर्भात सुरू आहेत. मात्र खरेदी अद्याप गतीमान झालेली नाही. (Kapus Kharedi)

कारण शेतकऱ्यांनी 'कपास किसान' ॲपवर एकर मापनानुसार नोंदणी केल्याने CCI च्या सॉफ्टवेअरमध्ये ती माहिती स्वीकारली जात नाही. या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांची माहिती सिस्टीममध्ये दिसत नसल्याने हमीदराने विक्री थांबली आहे. (Kapus Kharedi)

एकरी नोंदणीमुळे गोंधळ

'कपास किसान' ॲपवर नोंदणी करताना काही शेतकऱ्यांनी एकराऐवजी हेक्टरऐवजी एकर मोजमाप वापरले. मात्र CCI च्या सॉफ्टवेअरमध्ये फक्त हेक्टर मोजमापाचीच सोय असल्याने अशी नोंद वैध मानली जात नाही.

राज्यात ३८.३५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली असून, साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ॲपवर नोंदणी केली आहे. बाजार समित्यांनी पडताळणी करून मंजुरी द्यायची असली तरी एकरी नोंदीमुळे प्रक्रिया थांबली आहे.

शेतकऱ्यांना पुन्हा नोंदणीची वेळ

सीसीआयने या तांत्रिक त्रुटीची दखल घेतली असून, लवकरच हेक्टरप्रमाणे पुन्हा नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नोंदणी प्रक्रियेत उतरावे लागेल.

नोंदणी करताना आलेल्या अडचणींवर उपाय न मिळाल्यास शेतकऱ्यांचा त्रास वाढेल, अशी प्रतिक्रिया बाजार समित्यांमधून मिळत आहे.

ऑनलाइन स्लॉट बुकींगची अट

दरम्यान, हमी केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना यंदा 'कपास किसान' ॲपमधून स्लॉट बुकींग करावे लागणार आहे. रेल्वे तिकिटाप्रमाणे, शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठीची तारीख किमान तीन दिवस आधी ॲपवर नोंदवावी लागेल. त्या दिवशी केंद्रावर जागा नसेल तर दुसरी तारीख निवडावी लागणार आहे.

अज्ञानाचा व्यापाऱ्यांना फायदा

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने, ॲप वापरणे कठीण ठरत आहे. त्यामुळे अनेकांना स्लॉट बुकींग न झाल्यास खुल्या बाजारातच कापूस विकावा लागणार, आणि याचा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे.

खुल्या बाजाराच्या तुलनेत सीसीआयचा दर हजार रुपयांनी अधिक असल्याने शेतकरी हमी केंद्राकडे वळत आहेत, मात्र प्रक्रिया गुंतागुंतीची झाल्याने विक्रीत विलंब होत आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

संपूर्ण प्रक्रिया, नोंदणी, पडताळणी, बाजार समिती मंजुरी, सीसीआय मंजुरी आणि स्लॉट बुकींग ही डिजिटल पद्धतीने होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तांत्रिक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

त्यात एकरी नोंदणीमुळे आलेला गोंधळ आणि स्लॉट बुकींगची नवीन अट यामुळे यंदाची कापूस विक्री अधिकच किचकट बनली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Crop Insurance : खरीप हंगामात मोठे नुकसान; पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का?

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton Purchase: Farmers must be tech-savvy for sales at guarantee centers!

Web Summary : Farmers face tech hurdles selling cotton at guaranteed prices. App registration errors and slot booking complicate the process. Incorrect acre entries halt sales. Re-registration is now required, causing farmer distress and benefiting traders.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूसशेती