Kapus Kharedi : मराठवाड्यातील कापूस विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय कापूस महामंडळ (CCI) द्वारे होणाऱ्या कापूस खरेदीस १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे.(Kapus Kharedi)
मात्र, दोन शनिवार, तीन रविवार आणि होळी व रंगपंचमीच्या सुट्ट्या असल्यामुळे प्रत्यक्ष खरेदी फक्त सात दिवसात होणार आहे.(Kapus Kharedi)
गंगापूर तालुक्यात सुमारे दोन हजार, तर जिल्ह्यात साधारण आठ हजार शेतकरी कापूस विक्रीस प्रतीक्षेत आहेत.(Kapus Kharedi)
स्लॉट बुकिंग आणि मेसेज अपडेटसंदर्भातील सुधारणा
काही केंद्रांवर खरेदीसाठी स्लॉट बुकिंग बंद असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गैरसोय निर्माण झाली होती. मात्र, आता ही प्रक्रिया सुरळीत झाली असून, शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावर कापूस विक्रीसाठी तारीखेसह मेसेज येत आहेत.
ज्या शेतकऱ्यांचे मेसेज अद्याप आलेले नाहीत, त्यांनी संबंधित बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र किती दिवस खुले राहणार?
मुदतवाढ असूनही सुट्ट्या झाल्यामुळे फक्त सात दिवस खरेदीसाठी उपलब्ध राहणार आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की, या सात दिवसांत संपूर्ण खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल का? शेतकरी वर्गातून मागणी केली जात आहे की, सीसीआय केंद्रे १५ मार्चऐवजी ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवावी.
ग्रेड कमी होण्याची भीती
गतवर्षी कापसाच्या प्रतवारी व झडती कमी असल्यामुळे सीसीआयने काही वेळा ग्रेड कमी केला होता. यंदाही अशीच शक्यता असून, शेतकऱ्यांमध्ये कापसाची गुणवत्ता टिकेल का, याची चिंता आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक अपेक्षा
यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापूस विक्रीसाठी सीसीआय केंद्रांकडे धाव घेतली होती.
जिल्ह्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असली तरी ग्रामीण भागात २०-२५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात अजूनही पडून आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे, त्यामुळे केंद्रे लवकर सुरू राहणे आवश्यक आहे.
हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi :'सीसीआय' केंद्रांचे शटडाऊन; शेतकऱ्यांची कापूसकोंडी वाढली
Web Summary : Marathwada farmers face cotton sale worries as CCI centers are open just seven days due to holidays despite extension. Thousands await sales, demanding extension till March 31st fearing grade reduction and seeking better prices.
Web Summary : मराठवाड़ा के किसान कपास बिक्री को लेकर चिंतित हैं क्योंकि सीसीआई केंद्र विस्तार के बावजूद छुट्टियों के कारण केवल सात दिन खुले हैं। हजारों किसान बिक्री का इंतजार कर रहे हैं, ग्रेड में कमी के डर से 31 मार्च तक विस्तार की मांग कर रहे हैं और बेहतर कीमतों की तलाश में हैं।