Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kapus Kharedi : कापूस लागवड घटली, तरी 'सीसीआय'ने केली मोठी खरेदी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:16 IST

Kapus Kharedi :'सीसीआय'च्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करण्यात आली असून, ५.२० लाख क्विंटल कापसासाठी तब्बल ४११ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.(Kapus Kharedi)

जयेश निरपळ

भारतीय कापूस निगम (CCI) च्या माध्यमातून २०२५-२६ हंगामात जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Kapus Kharedi)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ शासकीय खरेदी केंद्रांद्वारे एकूण ५ लाख २० हजार ६०८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून, यापोटी ४११ कोटी रुपयांचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले आहे.(Kapus Kharedi)

पैठण तालुका आघाडीवर

जिल्ह्यातील विविध केंद्रांपैकी पैठण तालुक्यात सर्वाधिक कापूस खरेदी नोंदवली गेली. येथे सुमारे १ लाख क्विंटलांहून अधिक कापसाची खरेदी करण्यात आली, ज्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला.

लागवडीत २८% घट; शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह

दरवर्षी सुमारे ३.८८ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. मात्र, मागील हंगामातील कमी दर, खरेदी प्रक्रियेत झालेला विलंब, खरेदी केंद्रांचे तात्पुरते बंद राहणे या कारणांमुळे शेतकऱ्यांचा उत्साह कमी झाला. 

परिणामी, यंदा केवळ २.८२ लाख ९८५ हेक्टरवरच कापूस पेरणी झाली, म्हणजेच सरासरीच्या तुलनेत सुमारे २८ टक्क्यांची घट नोंदवली गेली.

खरेदी केंद्रनिहाय आकडेवारी (क्विंटलमध्ये)

पाचोड – ४७,१०८

बालानगर – ९८,५४५

गंगापूर – ४३,६९०

लासूर स्टेशन – ८७,५८४

वैजापूर – ५५,१५१

खुलताबाद – १,२९१

सोयगाव – १०,९०७

सिल्लोड – ८९,०३४

फुलंब्री – ८७,२९८

एकूण खरेदी : ५,२०,६०८ क्विंटल

शेतकऱ्यांना दिलासा, पण आव्हाने कायम

'सीसीआय'च्या खरेदीमुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळाला असला, तरी मागील वर्षीच्या अनुभवामुळे अनेकांनी कापसापासून दूर राहणे पसंत केले.

तज्ज्ञांच्या मते,

खरेदी प्रक्रिया वेळेत होणे

केंद्रांची संख्या वाढवणे

पेमेंटची गती वाढवणे

या बाबींवर भर दिल्यास पुढील हंगामात कापूस लागवड पुन्हा वाढू शकते.

जिल्ह्यात 'सीसीआय'च्या माध्यमातून झालेली मोठ्या प्रमाणातील खरेदी ही शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बाब असली, तरी लागवडीत झालेली घट ही चिंतेची बाब आहे. 

योग्य धोरणात्मक निर्णय घेतल्यास कापूस उत्पादनात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : कापूस विकायचा कुठे? सीसीआय केंद्रे बंद, शेतकऱ्यांना बसतोय खासगी बाजारात फटका

अधिक वाचा : Agriculture News : शेतकऱ्यांनो, सावध राहा; 'ही' आग हिरावतेय हातातोंडाशी आलेला घास!

English
हिंदी सारांश
Web Title : CCI's massive cotton purchase despite reduced cultivation offers relief.

Web Summary : CCI's cotton purchase in Chhatrapati Sambhajinagar district provided relief to farmers, disbursing ₹411 crore. Despite a 28% drop in cotton cultivation due to low prices and delayed processes, Paithan led in purchases. Experts suggest timely processes and more centers to boost future cultivation.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकापूस