Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kapus Kharedi : कापूस खरेदीचा पेच सुटला; सिल्लोडमधील १८ जिनिंगना 'सबयार्ड'चा दर्जा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:56 IST

Kapus Kharedi : सिल्लोड शहरात गेल्या २० दिवसांपासून ठप्प असलेली कापूस खरेदी अखेर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पणन संचालकांनी १८ जिनिंगना 'ना हरकत प्रमाणपत्र' देत त्यांना सबयार्ड घोषित केल्याने आता सीसीआयमार्फत कापूस खरेदी तत्काळ सुरू होणार असून, यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Kapus Kharedi)

Kapus Kharedi : गेल्या तब्बल २० दिवसांपासून ठप्प असलेली सिल्लोड शहरातील कापूस खरेदी अखेर पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Kapus Kharedi)

पुणे येथील पणन संचालक संजय कदम यांनी २३ डिसेंबर रोजी विशेष परिपत्रक काढत सिल्लोडमधील १८ जिनिंगना 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) देत त्यांना अधिकृतपणे सबयार्ड म्हणून घोषित केले आहे. (Kapus Kharedi)

या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सीसीआयमार्फत कापूस खरेदी तत्काळ सुरू होणार आहे.(Kapus Kharedi)

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिनिंग मालकांमधील प्रशासकीय वादामुळे कापूस खरेदी प्रक्रिया रखडली होती. बाजार समितीने जिनिंग मालकांकडे बाजार फी थकीत असल्याचे कारण पुढे करत 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्यास नकार दिला होता. (Kapus Kharedi)

परिणामी, शहरातील १६ जिनिंगमध्ये कापूस खरेदी प्रक्रिया सुरूच होऊ शकली नव्हती. तर उर्वरित दोन जिनिंगमध्ये २४ नोव्हेंबरपासून खरेदी सुरू झाली होती; मात्र ग्रेडर सुटीवर गेल्याने अवघ्या दहा दिवसांत तीही बंद पडली. (Kapus Kharedi)

या परिस्थितीमुळे ऐन हंगामात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. कापसाची आवक वाढत असताना खरेदी बंद राहिल्याने दरावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी सहकारी जिनिंगमध्ये तातडीने कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली.(Kapus Kharedi)

दरम्यान, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड शहरात तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला. अखेर पणन संचालक संजय कदम यांनी थेट हस्तक्षेप करत १८ जिनिंगना सबयार्डचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. (Kapus Kharedi)

१८ जिनिंगना सबयार्ड म्हणून मान्यता

किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी सिल्लोडमधील खालील १८ जिनिंगना सबयार्ड म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ऋषी फायबर्स, जय भगवानबाबा जिनिंग, हरिओम जिनिंग अँड प्रेसिंग, गौरी शंकर कोटेक्स, जोशी कोटेक्स, श्री रोकडोबा महाराज जिनिंग, पुनित इंटरप्रायजेस, किंजल कॉटन, सचिन फाईन कोटेक्स, त्रिवेणी कापूस उद्योग, सिल्लोड तालुका कॉटन जिनिंग अँड प्रेसिंग को-ऑपरेटिव्ह, राजराजेश्वर कापूस उद्योग, राधासर्वेश्वर जिनिंग, ओम एजन्सी, अग्रवाल कोटेक्स, नवीन कॉटेक्स, तायल कॉटन आणि माणिक कॉटन एलएलपी यांचा समावेश आहे.

४ डिसेंबरपासून सिल्लोड शहरातील दोन जिनिंगमधील कापूस खरेदी बंद होती, तर उर्वरित १६ जिनिंगमध्ये खरेदी सुरूच झाली नव्हती.

आता हा प्रशासकीय अडसर दूर झाल्याने शेतकऱ्यांना आपला कापूस हमीभावाने विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सिल्लोड परिसरातील कापूस बाजाराला पुन्हा चालना मिळणार आहे.

सीसीआय खरेदी तत्काळ सुरू

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सिल्लोडमधील १८ जिनिंगना ना हरकत प्रमाणपत्र देऊन सबयार्ड घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सीसीआयमार्फत कापूस खरेदी तत्काळ सुरू होईल. - संजय कदम, पणन संचालक

हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : कापूस खरेदी 'या' केंद्रावर ठप्प; काय आहे कारण वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton purchase in Sillod gins gets green light after dispute.

Web Summary : Sillod's cotton purchase resumes as 18 gins receive clearance. Market committee objections over fees were resolved, enabling CCI procurement and relieving farmers.
टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीशेती