Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kapus Kharedi : शेतकऱ्यांची अडवणूक रोखण्यासाठी प्रशासन सज्ज; कापूस खरेदीवर कडक 'वॉच' वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:40 IST

Kapus Kharedi : हिंगोली जिल्ह्यात १० नोव्हेंबरपासून CCI तर्फे कापूस खरेदीला सुरुवात झाली असून खरेदी प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी चारही केंद्रांवर स्थानिक निगराणी समित्या तैनात करण्यात आल्या आहेत. (Kapus Kharedi)

Kapus Kharedi : हिंगोली जिल्ह्यात कापूस हंगामाला सुरुवात झाली असून भारतीय कापूस निगम (CCI) तर्फे १० नोव्हेंबरपासून हमी भावाने कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे.  (Kapus Kharedi)

शेतकऱ्यांना खरेदीपूर्वी नोंदणीची सक्ती करण्यात आली असून, खरेदी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शेतकरीहिताची राहावी यासाठी सर्व खरेदी केंद्रांवर स्थानिक निगराणी समित्या तैनात करण्यात आल्या आहेत. (Kapus Kharedi)

'कापूस किसान' ॲपवर नोंदणी अनिवार्य असून प्रशासनाने शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी कडक देखरेख सुरू केली आहे.(Kapus Kharedi)

ॲपद्वारे जमिनीची पडताळणी

हमीभावाने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना 'कापूस किसान मोबाईल ॲप' वर नोंदणी करणे बंधनकारक आहे.

या ॲपद्वारे शेतकऱ्यांची जमीन नोंद

कापूस लागवड क्षेत्र

उत्पादनाचा तपशील

या सर्वांची डिजिटल पडताळणी केली जाणार आहे.

सीसीआयने स्पष्ट केले की, नोंदणीमुळे खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि शेतकऱ्यांना कोणतेही अडथळे येऊ नयेत याची विशेष काळजी घेतली जाईल.

तालुका स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त

किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेंतर्गत होणाऱ्या खरेदीमध्ये कोणतीही गफलत होऊ नये, यासाठी तालुका स्तरावरील सहायक निबंधक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हे अधिकारी संपूर्ण खरेदी प्रक्रिया, कागदपत्रे, शेतकऱ्यांची पडताळणी आणि अॅप आधारित प्रणाली यांवर देखरेख ठेवणार आहेत.

जिल्ह्यात चार खरेदी केंद्रांवर निगराणी समित्या तैनात

सीसीआयने हिंगोली जिल्ह्यातील खालील चार खरेदी केंद्रांवर स्थानिक निगराणी समित्या स्थापन केल्या आहेत :

हिंगोली

वसमत

कळमनुरी

औंढा नागनाथ

या समित्यांचा उद्देश शेतकऱ्यांना त्रास होऊ न देणे, अडथळे दूर करणे आणि कापूस खरेदीची पूर्णपणे पारदर्शक अंमलबजावणी करणे हा आहे.

तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली 'कडक नजर'

हिंगोली येथे स्थापन केलेल्या निगराणी समितीत समाविष्ट:

तहसीलदार श्रीकांत भुजबळ – अध्यक्ष

सहायक निबंधक एम.यू. यादव – सदस्य सचिव

तालुका कृषी अधिकारी शिवसंदीप रणखांब – सदस्य

केंद्रप्रमुख उमेश डाबेराव – सदस्य

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एन.बी. पाटील – सदस्य

ही टीम खरेदी केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, पडताळणी, तक्रारींची सोडवणूक आणि खरेदी प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडतेय का यावर सतत लक्ष ठेवणार आहे.

इतर तीन केंद्रांवरही तितकीच काटेकोर नजर

वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या केंद्रांवरही संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांची निगराणी समिती तयार केली आहे.

प्रत्येक केंद्रावर शेतकऱ्यांच्या तक्रारींची नोंद

वजन, गुणवत्ता तपासणी प्रक्रिया

कापूस स्वीकारण्याचा वेग

MSP नुसार त्वरित पैसे दिले जातात की नाही

यावर कठोर निरीक्षण ठेवले जाणार आहे.

सीसीआय व प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे  

* खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी ॲपवर नोंदणी पूर्ण करावी

* आवश्यक कागदपत्रे (७/१२, आधार, बँक खाते) सोबत ठेवावीत

* अधिकृत केंद्राशिवाय कुठेही माल विकू नये

* तक्रार असल्यास थेट निगराणी समितीशी संपर्क साधावा

हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : कापूस नोंदणी प्रक्रियेत अडचणींनंतर मोठा निर्णय; मुदतवाढ जाहीर वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Vigilance Committee to Monitor Cotton Procurement Centers: A Close Watch

Web Summary : Farmers need to register for cotton sales at support price via a mobile app. Local vigilance committees will oversee procurement centers to prevent farmer exploitation. Officials are appointed as nodal officers. Committees established at Hingoli, Wasmat, Kalamnuri, and Aundha Nagnath ensure transparency during cotton purchase.
टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती