Join us

Kapas App Training : तांत्रिक अडचणींवर उपाय; शेतकऱ्यांसाठी नोंदणी मदत केंद्र वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:51 IST

Kapas App Training : कपाशी विक्रीसाठी सीसीआयकडे नोंदणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा विचार करून घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीने नवा उपक्रम सुरू केला आहे. वाचा सविस्तर(Kapas App Training)

Kapas App Training : कपाशी विक्रीसाठी सीसीआयकडे नोंदणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा विचार करून घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीने नवा उपक्रम सुरू केला आहे. (Kapas App Training)

शेतकऱ्यांसाठी विशेष मदत केंद्र आणि गावागावांत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून कपास किसान ॲपवर नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करून कपाशी विक्रीसाठी प्रवेश मिळवणे सोपे होणार आहे.(Kapas App Training)

कपाशी विक्रीसाठी सीसीआय (Cotton Corporation of India) कडे नोंदणी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, कपास किसान ॲपवर नोंदणी करताना अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. (Kapas App Training)

ग्रामीण भागातील इंटरनेटची कमतरता, अँड्रॉइड मोबाईल हाताळण्याचे मर्यादित कौशल्य आणि ॲपमधील त्रुटींमुळे नोंदणी अपूर्ण राहत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विशेष मदत केंद्र सुरू केले आहे.(Kapas App Training)

शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात

बाजार समितीच्या मदत केंद्रात शेतकऱ्यांना नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. अॅपवर अर्ज करताना समस्या आल्यास शेतकरी थेट समितीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. चेतन ठाकरे, चैतन्य विरदंडे, प्रवीण पवार हे कर्मचारी नोंदणीसाठी मदत करतील, अशी माहिती समितीकडून देण्यात आली आहे.

गावागावांत मार्गदर्शन शिबिरे

नोंदणी सोपी व्हावी यासाठी बाजार समितीने पुढील आठवड्यात गावोगावी शिबिरे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पारवा, घोटी, शिवनी, जरूर मोहाडा, चिखलवर्धा, कुऱ्हाड, पांढुर्णा, शिरोली, पाटापांगरा, खापरी, मुरली आणि सायतखर्डा या गावांत शिबिरे भरवली जाणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना अॅप वापरण्याचे प्रशिक्षण, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि नोंदणी पूर्ण करण्यासाठी मदत केली जाईल.

कागदपत्रे सोबत आणा

नोंदणीसाठी शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे 

२०२४-२५ सालचा पेरा नमूद असलेला डिजिटल ७/१२ उतारा

आधारकार्ड

स्वतःचा मोबाईल फोन

पासपोर्ट साइज फोटो

नोंदणीदरम्यान कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन घेता येईल.

या उपक्रमामुळे कपूस विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी होणार असून, शेतकऱ्यांना वेळेत आणि त्रास होणार नाही नोंदणी पूर्ण करता येईल, असा विश्वास बाजार समितीने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा सविस्तर :  CCI Cotton Farmers App : सीसीआयचे 'कापस किसान' ॲप; शेतकऱ्यांसाठी कापसाची ऑनलाइन नोंदणी सुरू

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसयवतमाळबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्ड