Join us

Jamin Mojani Update : शेतकऱ्यांसाठी दिलासा! 'ई-मोजणी २.०' राज्यभरात जोमात वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:34 IST

Jamin Mojani Update : मोजणीतील गैरव्यवहारांना आता पूर्णविराम. वाशिमच्या भूमी अभिलेख विभागाने विकसित केलेली 'ई-मोजणी व्हर्जन २.०' (E-Counting 2.0) प्रणाली महाराष्ट्रात लागू झाली असून ती केवळ आधुनिक नाही, तर अचूक आणि पारदर्शकदेखील आहे. शेतकरी आणि जमीनधारकांसाठी ही प्रणाली म्हणजे विश्वासाचे नवसंचिती ठरणार आहे. (Jamin Mojani)

Jamin Mojani Update : मोजणीतील गैरव्यवहारांना आता पूर्णविराम. वाशिमच्या भूमी अभिलेख विभागाने विकसित केलेली 'ई-मोजणी व्हर्जन २.०' (E-Counting 2.0)प्रणाली महाराष्ट्रात लागू झाली असून ती केवळ आधुनिक नाही, तर अचूक आणि पारदर्शकदेखील आहे. (Jamin Mojani)

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी ही प्रणाली म्हणजे विश्वासाचे नवसंचिती ठरणार आहे.जमीन मोजणी प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करणाऱ्या 'ई-मोजणी व्हर्जन २.०'(E-Counting 2.0)प्रणालीचा यशस्वी अनुभव वाशिम जिल्ह्याने घेतल्यानंतर आता ही सुधारित प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रात अंमलात आणण्यात आली आहे.(Jamin Mojani)

गेल्या सात महिन्यांत या प्रणालीद्वारे तीन लाखांहून अधिक मोजणी प्रकरणे पार पडली असून, तक्रारींचे प्रमाण केवळ ०.३ टक्के इतके नगण्य नोंदवले गेले आहे.(Jamin Mojani)

काय आहे ई-मोजणी २.० प्रणाली?

ही प्रणाली जमीन मोजणी प्रक्रियेत 'रोव्हर' नावाच्या अचूक मोजणी करणाऱ्या यंत्राचा वापर करून अधिक विश्वासार्ह निकाल देते. मोजणीपूर्वी अर्जदारास स्पीड पोस्टाने नोटीस पाठवली जाते, मोजणीवेळी संबंधित जमिनीचा नकाशा व उपस्थितांचे फोटो प्रणालीवर अपलोड केले जातात. यामुळे प्रक्रिया पूर्णतः डिजिटल ट्रॅक होऊ शकते.

ई-मोजणी २.० ची ठळक वैशिष्ट्ये

* रोव्हर यंत्राद्वारे अचूक व जलद मोजणी

* ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा

* स्पीड पोस्टाने मोजणीपूर्व नोटीस

* मालक, साक्षीदारांचे फोटो व नकाशा अपलोड

'क' प्रतसह रेखांश- अक्षांश आधारित मोजणी नकाशा

पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराला आळा

ई-मोजणी प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पडते, त्यामुळे अकार्यक्षमता, दलाली, व मनमानी मोजणीला आळा बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळ, पैसे व श्रम वाचण्यासोबतच प्रशासनातील विश्वासार्हतेत वाढ झाली आहे.

वाशिमचा आदर्श राज्यासाठी दिशा

ही प्रणाली सर्वप्रथम वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात राबविण्यात आली होती. तेथील यशस्वी अंमलबजावणीनंतर ही प्रणाली आता संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे प्रभारी जिल्हा अधीक्षक श्रीकांत मुंढे यांनी दिली.

जमीन मोजणीसाठी 'ई-मोजणी व्हर्जन २.०' ही अत्याधुनिक प्रणाली सर्वप्रथम वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात वापरण्यात आली होती. या माध्यमातून कामाला गती प्राप्त होण्यासोबतच पारदर्शकता निर्माण झाली. त्यामुळेच राज्यभरात या प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.- श्रीकांत मुंढे, प्रभारी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख

हे ही वाचा सविस्तर : Jamin Mojani Update: जमीन हिस्सेवाटप मोजणी झाली स्वस्त; काय आहे निर्णय वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीजमीन खरेदी