Jamin Ferfar Nond : मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावावर करण्यासाठी एक ठराविक कायदेशीर प्रक्रिया असते. याला वारस नोंदणी किंवा वारस दाखला घेऊन फेरफार करून नाव लावणे असे म्हटले जाते.
मृत्यू दाखला मिळवा - सर्वप्रथम संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला (नगरपालिका /ग्रामपंचायत) मधून घ्या. तो अधिकृत आणि नोंदणीकृत असावा.वारस दाखला मिळवा (यासाठी दोन पर्याय असतात)अ) न्यायालयीन प्रक्रिया (अधिसंख्य वारस असल्यास) स्थानिक सिव्हिल कोर्टात वारस हक्क प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करावा. वकीलाच्या मदतीने अर्ज दाखल करून न्यायालयीन आदेश घ्यावा.ब) तालुका कार्यालय / तहसील ऑफिसकडून (सोपी केस असल्यास) तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज करून गाव पातळीवर चौकशी नोंदवून वारस दाखला मिळवता येतो. पंचनामे आणि साक्षीदार घेऊन महसूल विभाग अहवाल दिला जातो.
फेरफार नोंदणीसाठी अर्ज करा वारस दाखला आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यावर, तालाठी कार्यालयात जाऊन फेरफारासाठी अर्ज द्यावा. अर्जासोबत ही कागदपत्रे जोडावीतः मृत्यू प्रमाणपत्र वारस दाखला सातबारा उताऱ्याची प्रत आधार कार्ड /ओळखपत्रे अन्य संबंधित दस्तऐवज (जर घरातील सदस्यांची सहमती असेल तर ती)
फेरफार क्रमांक मिळवातलाठी कडून फेरफार नोंद घेतली जाते आणि एक क्रमांक दिला जातो. ही नोंद e-Satbara वर देखील दिसू लागते.
सातबारा उताऱ्यावर नाव लागते का ते तपासाफेरफार पूर्ण झाल्यानंतर, सातबारा उताऱ्यावर आपले नाव दाखल होते. तुम्ही ते mahabhulekh.maharashtra.gov.in वरून पाहू शकता.
संपूर्ण वारसांची यादी आवश्यक आहेकुणी एकट्याने अर्ज केला, आणि इतर वारस बाजूला ठेवले, तर त्या अर्जावर आक्षेप येऊ शकतो. सर्व वारसांनी सहमतीपत्र (संमतीपत्र) आवश्यक असते.
E-Satbara वर नाव दिसायला वेळ लागू शकतो? फेरफार मंजूर झाल्यावर पंधरा ते महिनाभराने ऑनलाईन नाव दिसायला सुरुवात होते. तसेच सर्वसामान्य अर्जासाठी कोणताही मोठा खर्च नसतो. कोर्टाच्या प्रक्रियेत फी कमी अधिक होऊ शकते. अधिक माहितीसाठी जवळच्या तलाठी कार्यालयात भेट द्या.
Web Summary : To transfer land after an owner's death, obtain the death certificate and heirship certificate. Apply for mutation at the Talathi office with necessary documents. Expect online updates within a month. Consent from all heirs is crucial for a smooth process.
Web Summary : मृत्यु के बाद भूमि हस्तांतरित करने के लिए, मृत्यु प्रमाण पत्र और उत्तराधिकार प्रमाण पत्र प्राप्त करें। आवश्यक दस्तावेजों के साथ तलाठी कार्यालय में नामांतरण के लिए आवेदन करें। एक महीने के भीतर ऑनलाइन अपडेट की अपेक्षा करें। सुचारू प्रक्रिया के लिए सभी उत्तराधिकारियों की सहमति महत्वपूर्ण है।