अमरावती : अनधिकृत आणि प्रतिबंधित बियाण्यांच्या विक्रीवर मोठा आळा घालत कृषी विभाग आणि शहर गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत अमरावती रेल्वे स्टेशनवरून लाखो रुपयांचा साठा जप्त केला.(HTBT cotton seeds)
या कारवाईत सुमारे ८.५ लाख रुपये किमतीची 'एचटीबीटी' कपाशीची ८०५ पाकिटे ताब्यात घेण्यात आली असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(HTBT cotton seeds)
गुप्त माहितीवरून सापळा
कृषी विभागाला रेल्वे स्टेशनवर संशयास्पद बियाण्यांचा साठा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने २४ एप्रिल रोजी रात्री पार्सल कार्यालयात सापळा रचला.
या वेळी चेतन सुखलाल ठाकरे (रा. मंगरूळ दस्तगीर) याच्या ताब्यातून १६ खाकी रंगाचे कट्टे जप्त करण्यात आले.
८०५ पाकिटांचा साठा जप्त
पंचांसमक्ष तपासणीदरम्यान या कट्ट्यांमध्ये तीन वेगवेगळ्या कंपन्यांची एकूण ८०५ बियाण्यांची पाकिटे आढळून आली.
यामध्ये शासनमान्यता नसलेली 'व्हाईट गोल्ड ५ जी प्रीमियम हायब्रीड कॉटन', 'पिंकगार्ड ५' आणि 'नक्षत्र रिसर्च हायब्रीड कॉटन' या नावांची बियाणे होती. ही सर्व बियाणे बोगस व प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट झाले.
साठ्याची किंमत ८.०५ लाख
जप्त साठ्यात
४७३ पाकिटे 'व्हाईट गोल्ड' (४.७३ लाख रुपये)
३०६ पाकिटे 'पिंकगार्ड' (३.०६ लाख रुपये)
२६ पाकिटे 'नक्षत्र रिसर्च' (२६ हजार रुपये)
अशा एकूण ८.०५ लाख रुपयांच्या बियाण्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे बनावट बियाण्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दोन आरोपींविरुद्ध गुन्हा
या प्रकरणात चेतन ठाकरे आणि विशाल प्रकाश भोई (रा. नंदुरबार) यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता, बियाणे नियम १९६८ आणि पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल भोई सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नंदुरबारला पाठविण्याची तयारी
ही बियाणे नंदुरबार जिल्ह्यात पाठविण्याच्या तयारीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांमुळे मोठे नुकसान होऊ शकते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे आणि पावती घेणे आवश्यक आहे.
या धडक कारवाईमुळे अमरावतीत बोगस बियाण्यांच्या काळ्या बाजाराला मोठा धक्का बसला असून, पुढील तपासातून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Amravati police seized ₹8.05 lakhs worth of unauthorized HTBT cotton seeds from the railway station. Two individuals were arrested for possessing 805 packets of spurious seeds from various companies intended for distribution in Nandurbar. An investigation is underway.
Web Summary : अमरावती में पुलिस ने रेलवे स्टेशन से 8.05 लाख रुपये के अवैध एचटीबीटी कपास बीज जब्त किए। नंदुरबार में वितरण के लिए विभिन्न कंपनियों के 805 नकली बीज पैकेट रखने के आरोप में दो लोगों को गिरफ्तार किया गया। जांच जारी है।