Lokmat Agro >शेतशिवार > एचटीबीटी कापूस बियाणे प्रकरण : विनावाॅरंट झडतीसह शेतकऱ्यास अटक कशी केली?

एचटीबीटी कापूस बियाणे प्रकरण : विनावाॅरंट झडतीसह शेतकऱ्यास अटक कशी केली?

Latest News HTBT cotton seed case How was the farmer arrested with warrantless search | एचटीबीटी कापूस बियाणे प्रकरण : विनावाॅरंट झडतीसह शेतकऱ्यास अटक कशी केली?

एचटीबीटी कापूस बियाणे प्रकरण : विनावाॅरंट झडतीसह शेतकऱ्यास अटक कशी केली?

HTBT Cotton Seed : महाराष्ट्र सरकारने कापसाच्या तणनाशक सहनशील एचटीबीटी बियाण्यांवर प्रतिबंध घातल्याने ही कारवाई करण्यात आली.

HTBT Cotton Seed : महाराष्ट्र सरकारने कापसाच्या तणनाशक सहनशील एचटीबीटी बियाण्यांवर प्रतिबंध घातल्याने ही कारवाई करण्यात आली.

शेअर :

Join us
Join usNext

- सुनील चरपे
नागपूर :
पेरणीसाठी कापसाचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे (HTBT Biyane) खरेदी करून घरी ठेवल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने रमेश नत्थू घाटोडे, रा. बिडगाव, ता. सावनेर या शेतकऱ्यास साेमवारी (दि. ९) अटक केली हाेती. पाेलिस काेठडीनंतर गुरुवारी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. विशेष म्हणजे, ही कारवाई न्यायालयाच्या अटक व झडती वाॅरंट विना करण्यात आल्याने पाेलिस व कृषी विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी साेमनाथ साठे यांच्या तक्रारीवरून केळवद (ता. सावनेर) पाेलिसांनी रमेश घाटाेडे यांच्या विराेधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३(५), पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ७, १५, बियाणे नियम १९६८ कलम ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४ आणि बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ कलम ३ अन्वये गुन्हा नाेंदवून अटक केली आणि त्यांना कळमेश्वर येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पहिल्यांदा दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली हाेती. त्यानंतर न्यायालयाने गुरुवारी (दि. १२) त्यांचा जामीन मंजूर केला.

बियाण्यांचा समावेश आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत करण्यात आल्याने तसेच महाराष्ट्र सरकारने कापसाच्या तणनाशक सहनशील एचटीबीटी बियाण्यांवर प्रतिबंध घातल्याने ही कारवाई करण्यात आली. वास्तवात, ही कारवाई करण्याचा अधिकार कृषी विभागाला आहे. कृषी विभाग त्यासाठी पाेलिसांची मदत घेताे. मात्र, कारवाईच्या वेळी कृषी विभागातील एकही अधिकारी किंवा कर्मचारी रमेश घाटाेडे यांच्या घरी हजर नव्हता. संपूर्ण कारवाई झाल्यानंतर कृषी अधिकारी केळवद पाेलिस ठाण्यात पाेहाेचले आणि त्यांनी तक्रार नाेंदविली.

लेखी नव्हे ताेंडी माहितीच्या आधारे कारवाई
बियाणे व पाेलिस यांचा थेट संबंध येत नाही. रमेश घाटाेडे यांच्या घरी एचटीबीटी बियाणे असल्याची माहिती कुणीतरी एलसीबीला दिली आणि त्यांनी धाड टाकली. परंतु, ही कारवाई करण्यासाठी एलसीबीच्या कर्मचाऱ्यांकडे रमेश घाटाेडे यांच्या विराेधात लेखी तक्रार नव्हती. त्यांनी घराची झडती घेण्यासाठी व रमेश घाटाेडे यांच्याविराेधात न्यायालयाचा वाॅरंट देखील नव्हता. या कारवाईत ५६ हजार रुपये किमतीचे बियाणे जप्त करण्यात आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

बियाणे तपासणी अहवालापूर्वीच कारवाई
जप्त केलेल्या बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर शहरातील बियाणे तपासणी प्रयाेगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी साेमनाथ साठे यांनी दिली. या बियाणे तपासणीचा रिपाेर्ट कधी येईल, हे सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वास्तवात, पाेलिस व कृषी विभागाने या बियाणे तपासणी अहवालाच्या आधारे रमेश घाटाेडे यांच्यावर कारवाई करायला हवी हाेती. मात्र, त्यांनी अहवालाची प्रतीक्षा न करता आधी कारवाई करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.

Web Title: Latest News HTBT cotton seed case How was the farmer arrested with warrantless search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.