Join us
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या घरगुती सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे, हे कसं ओळखायचं, पहा ही सोपी ट्रिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:30 IST

Gas Cylinder : अशा स्थितीत तुम्ही घरच्या घरी गॅस किती उरलाय, हे ओळखू शकता. 

Gas Cylinder  :  सध्या युद्ध परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा होत असल्याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या आहेत. यामुळे अनेक नागरिक गॅस भरण्याच्या चिंतेत आहेत. तर दुसरीकडे आपल्या घरातील गॅस किती शिल्लक आहे, याचीही विचारपूस केली जात आहे. अशा स्थितीत तुम्ही घरच्या घरी गॅस किती उरलाय, हे ओळखू शकता. 

गॅस सिलिंडरमध्ये किती गॅस उरला आहे, हे ओळखण्यासाठी, ओल्या कापडाची ट्रिक सर्वात सोपी आहे; सिलिंडरवर ओले कापड पुसल्यास, रिकाम्या जागेत लवकर सुकते, तर गॅस असलेल्या भागात ओलावा राहतो. म्हणजेच जिथे पाणी लवकर सुकेल तिथपर्यंत गॅस संपला आहे असे समजावे. 

गॅसची पातळी तपासण्याच्या सोपी पद्धत : 

ओल्या कपड्याची ट्रिक : सिलिंडरच्या कडेवर ओले कापड फिरवा किंवा पुसा. काही सेकंदात, जिथे गॅस संपला आहे (रिकामी जागा) तो भाग लवकर सुकेल आणि जिथे लिक्विड गॅस आहे तो भाग ओलसर राहील.गरम पाण्याची ट्रिक : गरम पाण्यात कापड भिजवून सिलिंडरच्या एका बाजूने सावकाश फिरवा. काही वेळानंतर, सिलिंडरवर हात फिरवून तपासा, जिथे सिलिंडर थंड लागेल तिथे गॅस आहे आणि जिथे गरम किंवा सामान्य लागेल तिथे गॅस संपला आहे.वजन करून : सिलिंडरचे रिकामे वजन त्यावर लिहिलेले असते. सिलिंडरचे सध्याचे वजन करा, त्यातून रिकामे वजन वजा केल्यास उरलेला गॅस मिळेल.निरीक्षण : गॅस कमी झाल्यावर ज्योत पिवळी पडू लागते किंवा बर्नर कमी दाबाने चालतो, हा गॅस संपत आल्याचा संकेत आहे. 

ही पद्धत वापरून तुम्ही ऐनवेळी गॅस संपण्याची समस्या टाळू शकता.  

English
हिंदी सारांश
Web Title : Easy tricks to check gas level in your cylinder at home.

Web Summary : Check gas levels easily using a wet cloth, warm water, or by weighing the cylinder. A yellow flame indicates low gas. Avoid last-minute gas shortages.
टॅग्स :गॅस सिलेंडरशेती क्षेत्रशेतीशेतकरी