Join us
Daily Top 2Weekly Top 5

जंगली प्राण्यांनी गोठ्यातील गाय, म्हैस, शेळीवर हल्ला केल्यास किती नुकसान भरपाई मिळते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:45 IST

Nuksan Bharpai : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पशुधनासह मनुष्यहानी देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

Nuksan Bharpai : अलीकडच्या काही वर्षात बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यात पशुधनासह मनुष्यहानी देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. यामुळे राज्यातील बिबट क्षेत्रात भीतीचे वातावरण आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते आहे. 

महाराष्ट्र शासनाकडून वन्य प्राणी हल्ल्यांमध्ये झालेल्या मनुष्यहानी व पाळीव प्राणी यांच्या हानीस देय नुकसान भरपाई- वाघ, बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या  हल्ल्यामुळे झालेली मानवी जीवितहानी किंवा पशुधनाला झालेली कोणतीही इजा याकरिता प्रदेय असलेल्या नुकसानभरपाईचे निकष काय आहेत, ते समजून घेऊयात. 

  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे देय नुकसानभरपाईचे दर
       क्रमांक                                            हानीचा प्रकारनुकसान भरपाईचा दर (रु.)
1मानवी जीवितहानी२५ लाख रुपये 
मानवास आलेले कायमस्वरूपी अपंगत्व७ लाख ५० हजार रुपये 
मानवाला झालेली गंभीर इजा५ लाख रुपये 
मानवाला झालेली किरकोळ इजाखाजगी रुग्णालयातील उपचार खर्च किंवा ५०,००० (जे कमी असेल)
   

 

ब) वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती किंवा जंगली कुत्रा यांच्या हल्ल्यामुळे झालेली पशू जीवांची हानी किंवा त्यांना पोहचलेली इजा यांकरिता प्रदेय असलेल्या नुकसानभरपाईचा दर पुढीलप्रमाणे असेल.

अक्र.पशुधनाचा प्रकारनुकसानाचा प्रकारनुकसानभरपाईचा दर (रु.)
गाय, म्हैस, बैलजीवित हानीबाजारभावाचे ७५% किंवा ७० हजार रुपये (जे कमी असेल ते)
मेंढी, शेळी व इतरजीवित हानीबाजारभावाचे ७५% किंवा १५ हजार रुपये  (जे कमी असेल ते)
गाय, म्हैस, बैलकायमस्वरूपी विकलांगताबाजारभावाचे ५०% किंवा १५ हजार रुपये (जे कमी असेल ते)
गाय, म्हैस, बैल,मेंढी, शेळीइजाजखमी झालेल्या पशुच्या उपचारासाठी केलेला वैद्यकीय खर्च प्रदान करण्यात येईल. जखमी पशूचा उपचार, शासकीय किंवा जिल्हा परिषदेच्या पशुचिकित्सालयात करण्यात येईल. प्रदेय असलेली रक्कम पशुच्या बाजार किंमतीच्या पंचवीस टक्के किंवा फक्त पाच हजार रुपये यांपैकी जी कमी असेल तितकी या मयदित असेल.

 

अशा पद्धतीने शासनाकडून नुकसान भरपाईचे निकष सांगितले आहेत. जर तुमच्याही पशुधनाला वन्यप्राणी हल्ल्यात जीव गमवावा लागला असेल किंवा इजा झाली असल्यास जवळच्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन भेट द्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Compensation for Livestock Loss from Wild Animal Attacks: Details

Web Summary : Maharashtra offers compensation for livestock deaths or injuries caused by wild animal attacks like tigers or leopards. Compensation varies based on the animal and injury severity. For cow/buffalo death compensation is market value's 75% or ₹70,000 (whichever is less). Contact your local agriculture office for assistance.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनाबिबट्याबिबट्याचा हल्ला