Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hirakani Haat Latur :'हिरकणी हाट' ठरतेय हिट; ग्रामीण उत्पादनांना शहरात दणदणीत प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:51 IST

Hirakani Haat Latur : लातूर मध्ये सुरू असलेल्या ‘हिरकणी हाट’ प्रदर्शनात ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना शहरात जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, केवळ तीन दिवसांत लाखोंची उलाढाल झाली आहे. या प्रदर्शनामुळे महिला उद्योजकांना मोठी बाजारपेठ मिळत आहे.(Hirakani Haat Latur)

लातूर : ग्रामीण भागातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणाऱ्या 'हिरकणी हाट' प्रदर्शनाला लातूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे.(Hirakani Haat Latur)

जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनात केवळ तीन दिवसांत तब्बल २३ लाख रुपयांची उलाढाल झाल्याने महिला उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Hirakani Haat Latur)

१०० हून अधिक स्टॉल्स; ग्रामीण उत्पादनांना शहरात दाद

लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात

१०० हून अधिक स्टॉल्स

ग्रामीण महिला बचत गटांची उत्पादने

खाद्यपदार्थ, हस्तकला, गृहसजावटीच्या वस्तू

या सर्वांना नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

तीन दिवसांत २३ लाखांची विक्री

पहिल्या दोन दिवसांत: १५ लाखांची उलाढाल

तिसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद

एकूण विक्री: २३ लाखांच्या घरात

विशेष म्हणजे रविवारी एका दिवसातच ८.४१ लाखांची विक्री झाली.

गावरान चवीची मेजवानी ठरली आकर्षण

खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांची विशेष गर्दी दिसून आली.

यामध्ये दही-धपाटे, झुणका-भाकरी,  मठ्ठा, डाळ-भाकरी अशा पारंपरिक पदार्थांना ग्राहकांनी मनसोक्त पसंती दिली.

हस्तकला व गृहसजावटीच्या वस्तूंनाही मागणी

खाद्यपदार्थांबरोबरच बंजारा आर्टिकल्स

लाकडी बैलगाडी, जाते, पाळणा, सागवानी पाट, घरगुती मसाले, शुद्ध मध या वस्तूंनाही मोठी मागणी आहे. काही स्टॉल्सवर दोन दिवसांतच

हजारो रुपयांची विक्री झाली आहे.

स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ

कडुनिंब व जंगली मधासह विविध फ्लेवर्सना मागणी

२ दिवसांत ४० किलो मधाची विक्री

नाचणी पापड, बाजरी उत्पादने यांनाही चांगला प्रतिसाद

महिला उद्योजकांना नवी संधी

या प्रदर्शनामुळे महिला बचत गटांना थेट ग्राहकांशी संपर्क

'बिझनेस नेटवर्किंग' वाढ

आर्थिक सक्षमीकरणाला चालना

राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी

प्रदर्शनासोबत सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिक त्याचाही आनंद घेत आहेत. हे प्रदर्शन २६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

'हिरकणी हाट' प्रदर्शनामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना शहरात मोठी बाजारपेठ मिळत असून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ मिळत आहे.स्थानिक उत्पादनांना मिळालेला हा प्रतिसाद भविष्यात अशा उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

रुखवतासाठी लाकडी बैलगाडी, जाते, पाळणा, बाज, सागवानी पाट या वस्तूंना ग्राहकांची मागणी असून, दोन दिवसांत १८ हजार ४०० रुपयांच्या साहित्यांची विक्री झाली आहे.- शुभांगी पांचाळ, उमरगा य., ता. अहमदपूर.

कडुनिंब, जंगली मधाबरोबरच विविध फ्लेवर्सना मागणी आहे. २ दिवसांत ४० किलो मधाची विक्री झाली आहे.- सिद्धेश्वर धाराशिवे, आलमला ता. औसा

नाचणी पापड, बाजरीच्या खारुड्यांना ग्राहकांची विशेष मागणी आहे. रविवारी जवळपास ९ हजारांची विक्री झाली. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याने प्रदर्शनात जवळपास दीड लाखांचा व्यवसाय होईल.- दीपाली टाकेकर, नणंद, ता. निलंगा

ग्रामीण भागातून आलेल्या 'हिरकणीं'ना लातूर जि.प.चे सीईओ राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बळ देण्याचे काम सुरू आहे. प्रदर्शनात विक्रीबरोबरच महिला बचत गटांचे 'बिझनेस नेटवर्किंग'ही वाढत आहे. पारंपरिक खाद्यपदार्थ, साहित्यांना ग्राहकांची चांगली मागणी आहे.- देवकुमार कांबळे, व्यवस्थापक, उमेद अभियान

हे ही वाचा सविस्तर : Umed Scheme : माऊलीच्या कष्टाला लेकरांची स्मार्ट साथ; 'उमेद'ने घडवली बिझनेस क्रांती!

अधिक वाचा : Hingoli Halad Project : हळद उत्पादकांसाठी खुशखबर; हिंगोलीत उभारणार ५ हजार टन क्षमतेचे भव्य गोदाम

टॅग्स :शेती क्षेत्रमहिलाशेतकरीशेती