Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 'या' पाच प्रकारच्या विणकारांसाठी शासनाचा मह्त्वपूर्ण निर्णय, दहा हजारांचे अनुदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:38 IST

Agriculture News : या पाच पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील विणकरांना अनुदान दिले जाणार आहे.

Government GR : गणेश चतुर्थी निमित्त राज्यातील पैठणी साडी, हिमरु शाल, करवत काठी साडी, घोंगडी व खण फॅब्रीक या पाच पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना प्रति पुरुष १० हजार रुपये व प्रति महिला १५ हजार रुपये याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांना उत्सव भत्ता देण्यासाठी २ कोटी ७० लाख  रुपयांचा निधी वितरीत व खर्च करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात आली आहे.

सदर रक्कम ज्या प्रयोजनासाठी वितरीत करण्यात येत आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावी. तसेच, शासनाचे प्रचलित नियम व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्याची दक्षता घेण्यात यावी.

वैयक्तिक लाभार्थ्यांची देयके आहरित करताना लाभार्थ्यांची यादी निश्चित करुन योग्य त्या तपशीलासह देयकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थ्यांची अनुदाने आहरित करण्यात येऊ नयेत.

सदर योजनेंतर्गत प्रमाणित व नोंदणीकृत पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना देण्यात येणारा उत्सव भत्ता डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात यावा.उक्त खर्च हा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत गणेश चतुर्थी निमित्त राज्यातील पाच पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना उत्सव भत्ता योजनेचा लाभ देण्याकरिता गणेश चतुर्थी निमित्त पाच पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणीत व नोंदणीकृत विणकरांना उत्सव भत्ता योजना अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.

उक्त निधी आहरण करुन संबंधितांना संवितरीत करण्यासाठी सहायक संचालक (लेखा), वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच, आयुक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. उक्त निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर आयुक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे अधिनस्त सुपूर्द करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Govt Announces Grant for Weavers of Five Traditional Textiles

Web Summary : Maharashtra government approves grants for registered weavers of Paithani, Himroo, Karvat Kathi, Ghongadi and Khan fabrics. Men will receive ₹10,000 and women ₹15,000 as an allowance, with ₹2.7 crore allocated for this initiative via DBT system.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीकापूसशासन निर्णय