Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात शेळ्यांना दररोज इतके लिटर पाणी पाजा, ही लस टोचून घ्या, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 18:35 IST

Goat Farming : उष्णतादाह (Heat Stroke) आणि निर्जलीकरणापासून वाचवण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Goat Farming :   उन्हाळ्याच्या कडक उन्हात शेळ्यांना उष्णतादाह (Heat Stroke) आणि निर्जलीकरणापासून (Dehydration) वाचवण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात शेळ्यांना सामान्य दिवसांपेक्षा दुप्पट पाण्याची गरज असते. त्यामुळे या काळात पाण्याची गरज कशी असते, ते समजून घेऊयात... 

उन्हाळ्यात शेळ्यांचे पाणी व्यवस्थापन :

  • सर्वसाधारणतः शेळ्यांना पिण्याकरिता दररोज ५ ते ७ लिटर पाणी लागते. 
  • परंतु उन्हाळ्यात त्यांना १५ ते २० लिटर पाणी लागते. 
  • किंवा प्रति एक किलो शुष्क चाऱ्यामागे ४ लिटर पाणी देणे आवश्यक आहे. 
  • बंदिस्त शेळीपालनात पिण्याचे मुबलक स्वच्छ ताजे पाणी २४ तास उपलब्ध करून द्यावे. 
  • पिण्याच्या पाण्याचे तापमान २० ते २४ अंश सेल्सीअस असावे. 
  • उन्हाळ्यात शेळ्यांना पिण्यासाठी माठ किंवा रांजणातील पाणी दिल्यास ते पाणी शेळ्या आवडीने पितात.
  • शेळ्यांना बुळकांडी रोगप्रतिबंधक लस या महिन्यात (एप्रिलमध्ये) टोचुन घ्यावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Summer Goat Care: Hydration Tips and Vaccination Guide Detailed

Web Summary : Ensure goats get 15-20 liters of water daily in summer to prevent dehydration. Provide fresh, cool water (20-24°C) and administer the 'Bulakandi' disease vaccine in April. Adjust water based on dry feed intake.
टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रशेतकरीशेती