जळगाव : रेशनकार्डनंतर आता जिल्ह्यातील १२ लाख ३६ हजार ८०५ एलपीजी गॅसधारकांसाठी प्रशासनाने नव्या नियमांच्या चाळणी हाती घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या 'उज्ज्वला' योजनेच्या लाभार्थ्यांसह अनेकांच्या नावाला कात्री लागणार आहे. साहजिकच जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे.
गेल्या ९ महिन्यांपासून एलपीजी सिलिंडरची उचल न करणाऱ्या लाभार्थ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. अन्न व पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार ९ महिन्यांपासून सिलिंडरच्या लाभ न घेणाऱ्यांना यापुढे सरसकट लाभमिळणार नाही. त्यांना 'केवायसी' केल्यानंतरच सिलिंडरचा लाभ मिळणार आहे.
त्यासोबत मोबाईल नंबर बदल करणाऱ्यांनाही या सिलिंडरच्या लाभापासून चारहात दूर थांबावे लागणार आहे. त्यांना नव्याने केवायसी केल्यानंतर सिलिंडर उपलब्ध होणार आहे.
'उज्ज्वला'साठीही अट
उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी दरवर्षी केवायसी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. गैरप्रकारांना रोखण्यासाठी ही सक्त्ती करण्यात आली आहे. दरवर्षी केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेचा लाभ दिला जाणार नसल्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
उत्पन्नाची चाळणी
तशातच एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानाचे नियम केंद्र सरकारकडून अधिक कडक केले आहेत. वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा जास्त असलेल्या ग्राहकांना यापुढे अनुदान मिळणार नाही. जिल्ह्यातील १२ लाखांवर लाभार्थ्यांमध्ये अनुदानित गॅस वापरणारे मोठे उद्योजक आणि व्यावसायिकांसह अन्य घटकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांचे नाव यादीतून वगळले जाणार आहे.
बनावट गॅस कनेक्शनवर गंडांतर
बनावट कागदपत्रांवर किंवा मृत व्यक्तींच्या नावावर असलेल्या गॅस कनेक्शनही बंद केले जात आहेत. आधार डेटाबेसच्या माध्यमातून या खात्यांची ओळख पटवून त्यांचे नाव वगळण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तुमचाही पीक विमा जमा झाला नाही का? पहिल्यांदा हे काम करा, तरच खात्यात जमा होईल!
Web Summary : Jalgaon LPG users face stricter rules. KYC isn't enough; nine-month non-users, mobile changes require re-KYC. Annual KYC is mandatory for Ujjwala beneficiaries. High-income earners and fake connections face disconnection, impacting lakhs of users.
Web Summary : जलगांव एलपीजी उपयोगकर्ताओं के लिए नियम सख्त। केवाईसी पर्याप्त नहीं; नौ महीने से उपयोग न करने वालों, मोबाइल बदलने पर फिर से केवाईसी जरूरी। उज्ज्वला लाभार्थियों के लिए वार्षिक केवाईसी अनिवार्य। अधिक आय वाले और फर्जी कनेक्शन डिस्कनेक्शन का सामना करेंगे, जिससे लाखों उपयोगकर्ता प्रभावित होंगे।