Join us
Daily Top 2Weekly Top 5

Garlic Farming : लसूण लागवडीत क्रांती! 'या' नव्या पद्धतीने शेतकऱ्याचा जबरदस्त फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 10:19 IST

Garlic Farming : लसूण लागवडीत (Garlic Cultivation) एक नवा प्रयोग यशस्वी ठरला असून, पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्राचा वापर करून उत्पादनात मोठी वाढ साधली आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळाल्याने हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरत आहे. जाणून घ्या सविस्तर (Garlic Farming)

Garlic Farming : लाडसावंगी परिसरातील एका शेतकऱ्याने लसूण लागवडीमध्ये(Garlic Cultivation) नवा प्रयोग करत भरघोस उत्पादन मिळवले आहे.(Garlic Farming)

पारंपरिक सरी पद्धतीऐवजी बेड पद्धतीचा अवलंब करत त्यांनी उत्पादनात लक्षणीय वाढ साधली असून, हा प्रयोग आता इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.(Garlic Farming)

किरण पडूळ यांचा यशस्वी कृषी प्रयोग

लाडसावंगी येथील शेतकरी किरण पडूळ यांनी २९ नोव्हेंबर रोजी एक एकर क्षेत्रात बेड पद्धतीने लसूण लागवड केली. यासाठी त्यांनी सुमारे अडीच क्विंटल बियाण्याचा वापर केला आणि ठिबक सिंचनाची सुविधा उभारली.

आज या पिकाने चांगली वाढ घेतली असून, बाजारात विक्रीसाठी तयार झाले आहे.

पारंपरिक सरी पद्धतीपेक्षा फायदेशीर

* सामान्यतः लसूण लागवड सरी पद्धतीने केली जाते.

* मात्र या पद्धतीत जास्त पाण्याची गरज भासते.

* आंतर मशागतीचा खर्च वाढतो

* वेळ आणि श्रम अधिक लागतात

बेड पद्धत

* याउलट बेड पद्धतीत फक्त दोन वेळा आंतर मशागत पुरेशी ठरते.

* ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते

* वेळ आणि खर्च दोन्ही कमी होतात

उत्पादनात वाढ, उत्पन्नात मोठी झेप

या पद्धतीमुळे एकरी सुमारे ४० क्विंटल उत्पादन अपेक्षित असून, यापासून ४ ते ५ लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.

लसूण लागवडीपासून काढणीपर्यंत एकूण खर्च सुमारे ६० हजार रुपये झाला असल्याचे किरण पडूळ यांनी सांगितले.

रोगराई कमी, उत्पादन हमखास

बेड पद्धतीमुळे पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. त्यामुळे उत्पादन अधिक सुरक्षित आणि स्थिर राहते.

या प्रयोगाबाबत कृषी सहायक सुधाकर पाटील यांनीही शेतकऱ्यांना बेड पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.

इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श

लाडसावंगीतील हा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत असून, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी बेड पद्धतीचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतीचा योग्य वापर केल्यास शेतीतूनही मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो, हे किरण पडूळ यांच्या प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हे ही वाचा सविस्तर :Farmer Success Story : 'देशी' शेतकरी, 'इंटरनॅशनल' ओळख; ऑक्सफर्डमध्ये सांगणार यशाचा मंत्र

अधिक वाचा : AI Farming : परंपरेला टेक्नॉलॉजीची जोड; 'एआय' गुढीने वेधलं सगळ्यांचं लक्ष

English
हिंदी सारांश
Web Title : Revolution in Garlic Farming: Farmer's Huge Profit with New Method

Web Summary : A farmer in Ladsavangi revolutionized garlic cultivation using the bed method instead of traditional ridges. This increased yield significantly while reducing water usage, labor, and costs. The innovative approach is now a model for other farmers, promising higher profits and stable production due to reduced disease.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती