Join us

Ganesh Chaturthi : गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वा कशा ओळखायच्या, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:45 IST

Ganesh Chaturthi 2025 :

Ganesh Chaturthi 2025 : आज गणेश चतुर्थी. आणि गणेश चतुर्थी म्हटलं की अनेक गोष्टींचा अंतर्भाव असतो. त्यामध्ये एक दुर्वांना विशेष महत्व असते. दुर्वा या गणपतीला प्रिया असल्याचे सांगितले. जाते. म्हणूनच गणपतीजवळ दुर्वा ठेवल्या जातात. आज गणेश चतुर्थी असल्याने अनेक भाविक भक्त दुर्वा घेण्यासाठी बाजारात जात असतात. 

किंवा आता या दुर्वा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत. मात्र अनेकदा दुर्वा घेल्यानंतर भाविकांना त्या ओळखण्यात अडचण येत असते. किंवा बाजारात किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून आणलेल्या दुर्वा ओळखण्यात चूक होते. त्यामुळे आपण दुर्वा घेताना फसतो. तर अशावेळी या दुर्वा कशा ओळखायच्या ते पाहुयात... 

दुर्वांना धार्मिक विधींमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे. गणपतीच्या पूजेत दुर्वांचा वापर करतात. कारण या गणपतीला प्रिय आहेत असे मानले जाते. दुर्वा म्हणजे हे पातळ देठांचे बारमाही गवत असते, जे साधारणपणे ३०-४० सेमी उंचीपर्यंत वाढते. याची पाने लांब, सपाट आणि २-८ सेमी लांब असतात. दुर्वा सामान्यतः मोकळ्या शेतात, रस्त्याच्या कडेला आणि बागांमध्ये आढळते. साधारणपणे लहान व हिरव्यागार स्वरूपात असते.

दुर्वा गवत सामान्यतः जमिनीपर्यंत खाली वाढते आणि लवकर पसरते, ज्यामुळे दाट हिरवा गालिचा तयार होतो. त्याला उबदार वातावरण आवडते आणि ते बहुतेकदा बागांमध्ये, मोकळ्या शेतात आणि फुटपाथवरील भेगांमध्ये देखील आढळते. जर तुम्ही त्यांना स्पर्श केला तर ती वर गुळगुळीत वाटतात पण खालून थोडीशी खडबडीत वाटतात. रंग चमकदार हिरवा आहे, जरी कोरड्या परिस्थितीत तो थोडा फिकट होऊ शकतो.

म्हणजेच इतर गवंतासारखीच रचना असल्याने बाजारात फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणूनच दुर्वा घेताना किंवा रानातून आणताना वरील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून सामान्य गवत आणि दुर्वामधील आपल्याला फरक लक्षात येईल. 

टॅग्स :गणेश चतुर्थीशेती क्षेत्रशेतीगणेशोत्सव