Join us

Floriculture Farming : पारंपरिक शेतीला पूरक पर्याय; फुलशेतीमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 15:23 IST

Floriculture Farming : गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळीच्या मोठ्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी फुलांची नियोजित लागवड केली. योग्य वेळ, योग्य बाजारपेठ आणि योग्य किंमत फुलशेतीतून मिळते आर्थिक बळकटी. वाचा सविस्तर (Floriculture Farming)

बी. व्ही. चव्हाण

अलीकडच्या काळात पारंपरिक शेतीपेक्षा नगदी पीक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय म्हणून फुलशेतीशेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. उत्पादन खर्चावर आधारित भावासाठी योग्य बाजारपेठेची निवड आणि सतत वाढणाऱ्या आर्थिक लाभामुळे अनेक शेतकरी आता फुलशेतीकडे वळले आहेत.(Floriculture Farming)

फुलशेतीचे प्रमुख प्रकार 

उमरी तालुक्यातील शेतकरी गुलाब, झेंडू, शेवंती, गलांडा, बिजली, निशिगंध यासारख्या फुलांची लागवड करत आहेत. 

या भागातील हवामान आणि सिंचन व्यवस्था फुलशेतीसाठी अत्यंत अनुकूल आहेत.

फुलशेती खुल्या शेतात, पॉलिहाऊस किंवा ग्रीन हाऊस मध्ये केली जाते.

सण, उत्सव, लग्न समारंभ, धार्मिक विधी, सजावट, उद्घाटने यांसाठी फुलांची मोठी मागणी आहे.

अलीकडच्या काळात फुलांना स्वतः ची स्वतंत्र बाजारपेठ तयार झाली आहे. यामुळे रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक उलाढालीतही फुलशेतीने पर्याय निर्माण केला आहे.

श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी फुलशेतीची लागवड केली आहे. सिंचन व्यवस्था तसेच योग्य हवामान असल्यामुळे फुलशेती चांगल्या प्रमाणात बहरली असून आर्थिक लाभ होत आहे.

शेतकऱ्यांची मेहनत आणि उत्पादन

गेल्या ८–१० वर्षांत उमरी तालुक्यातील सावरगाव, गोरठा, रामखडक, कौडगाव, बोळसा, सालेगाव, कळगाव, हातनी या गावांतील शेतकऱ्यांनी फुलशेतीमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे.

दररोज ५०–६० फुल उत्पादन करणारे शेतकरी जवळच्या तेलंगणा राज्यातील निजामाबाद, महाराष्ट्रातील नांदेड व पुणे शहरांपर्यंत फुलांची विक्री करतात.

सध्या गुलाबाची किंमत १५०–१८० रुपये प्रति किलो आणि झेंडूची किंमत ७०–८० रुपये प्रति किलो आहे.

रेल्वे वाहतूक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी व सोयीस्कर झाली आहे, त्यामुळे ताजे फुल कमी वेळेत बाजारात पोहोचतात.

आर्थिक लाभ

बहुसंख्य शेतकरी फुलशेतीची लागवड करत आहेत आणि अपेक्षित आर्थिक लाभ मिळवत आहेत.

तालुक्यात दररोज सुमारे १० क्विंटल फुलांची विक्री होत आहे.

श्रावण महिन्यात फुलांना चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त झाले आहे.

गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांसाठी शेतकऱ्यांनी विशेष फुलशेती केली आहे.

फुलशेतीसाठी अनुकूल वातावरण

सिंचन व्यवस्था आणि योग्य हवामान फुलशेतीसाठी अत्यंत अनुकूल आहेत.

यामुळे फुलशेती चांगल्या प्रमाणात बहरली असून शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळाला आहे.

फुलशेतीमुळे पारंपरिक शेतीला पूरक पर्याय मिळाला असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न बळकट झाले आहे.

उमरी तालुक्यातील शेतकरी आता फुलशेतीला आर्थिक आणि सामाजिक यश मानून मोठ्या प्रमाणावर अंगीकारत आहेत. नगदी पीक, बाजारपेठेची उपलब्धता, रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक मागणी यामुळे फुलशेती पारंपरिक शेतीसाठी बळकट पूरक ठरली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : कोरफडीच्या पानातून यशाची फुले; दांडे परिवाराचा नवा यशस्वी मार्ग वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीफुलशेतीफुलंनांदेड