Fertilizer Demand : मध्य-पूर्व आशियातील वाढती युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या चर्चांमुळे चिखली तालुक्यात खरीप हंगामापूर्वीच खत खरेदीला मोठा वेग आला आहे. (Fertilizer Demand)
विशेषतः डीएपी आणि संयुक्त खतांची आगाऊ खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, एप्रिल महिन्यात खत विक्रीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे.(Fertilizer Demand)
खरीप हंगाम तोंडावर आला असून तालुक्यातील शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. संभाव्य खतटंचाई टाळण्यासाठी अनेक शेतकरी आधीच खतांचा साठा करून ठेवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.(Fertilizer Demand)
सोयाबीन पेरणीसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी
चिखली तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख १३ हजार ६९६ हेक्टर इतके आहे. त्यापैकी सुमारे ९० हजार ६९२ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे.
तालुक्यात यंदाही सोयाबीन हे प्रमुख पीक राहणार असून तब्बल ७३ हजार ४५६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी अपेक्षित आहे. तसेच तुरीचे क्षेत्र सुमारे ११ हजार ८७८ हेक्टर राहण्याचा अंदाज आहे.
यामुळे खरीप हंगामासाठी खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे.
खरीपासाठी १८ हजार मे.टन खतांची मागणी
तालुक्यात खरीप हंगामासाठी एकूण १८ हजार ३४ मेट्रिक टन खतांची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यापैकी मे अखेरपर्यंत सुमारे ११ हजार १२५ मेट्रिक टन खतांचा पुरवठा अपेक्षित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
सध्या तालुक्यातील ६५ अधिकृत विक्री केंद्रांवर खत विक्री सुरू असून प्रशासनाने खतसाठा समाधानकारक असल्याचा दावा केला आहे.
कोणत्या खतांची किती मागणी?
खरीपासाठी विविध खतांची पुढीलप्रमाणे मागणी नोंदवण्यात आली आहे.
युरिया – १,७५० मे.टन
डीएपी (DAP) – ३,५०० मे.टन
म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) – १७५ मे.टन
सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) – २,७५० मे.टन
संयुक्त खते – ८,८०९ मे.टन
मिश्र खते – ८५० मे.टन
टीएसपी (TSP) – २०० मे.टन
काही खतांचा ४० ते ४५ टक्के पुरवठा प्राप्त झाला असून काही खतांचा ८० ते ९० टक्के साठा उपलब्ध आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
सध्या खतांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज असून ६५ अधिकृत विक्री केंद्रांवर खत विक्री सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाईगडबडीत साठेबाजी करू नये आणि अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करून पक्के बिल घ्यावे.- अशोक सुरडकर, तालुका कृषी अधिकारी
डीएपीला पर्याय वापरण्याचे आवाहन
डीएपी खताला शेतकऱ्यांकडून सर्वाधिक पसंती मिळत असली तरी कृषी विभागाने पर्यायी खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे.
कृषी विभागाच्या मते, ट्रिपल सुपर फॉस्फेट (TSP) आणि युरियाचा संतुलित वापर केल्यास डीएपीइतकेच नत्र आणि स्फुरद मिळू शकते. तसेच युरिया फॉस्फेट खतामध्ये गंधक उपलब्ध होत असल्याने सोयाबीनसारख्या तेलबिया पिकांसाठी ते अधिक फायदेशीर ठरू शकते.
युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तणाव आणि खतांच्या आयातीवर होणारा संभाव्य परिणाम यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
मागील काही वर्षांमध्ये खतटंचाईच्या अनुभवामुळे यंदा अनेक शेतकरी आधीच खत खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.
तथापि, प्रशासनाने पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करत शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
अधिक वाचा : Pik Vima Yojana : विमा कंपनीचा बनाव फसला! परभणीतील शेतकऱ्यांना अखेर मिळणार थकीत पीकविमा
Web Summary : Amid war concerns and potential shortages, Chikhli farmers are buying fertilizers early, especially DAP, for the upcoming Kharif season. The agriculture department assures sufficient stock, urging farmers to avoid panic buying and trust authorized dealers.
Web Summary : युद्ध की चिंताओं और संभावित कमी के बीच, चिखली के किसान आगामी खरीफ सीजन के लिए जल्दी उर्वरक, विशेष रूप से डीएपी खरीद रहे हैं। कृषि विभाग पर्याप्त स्टॉक का आश्वासन देता है, किसानों से घबराहट में खरीदारी से बचने और अधिकृत डीलरों पर भरोसा करने का आग्रह करता है।