Ferfar Nond : तुमच्या सातबारा उताऱ्यावर (Satbara Utara) चुकीच्या खोट्या फेरफाराची नोंद झाली आणि त्याला १०-१५ वर्ष देखील होऊन गेले. तर कोणत्याही फेरफाराच्या अपीलाचा कालावधी हा ०७ ते ९० दिवसांचा असतो. जर समजा उशीर झाला असल्यास संबंधित फेरफार अपीलासाठी मुदत बाह्य झाला आहे, असे समजावे अशावेळी काय करायचं, हे समजून घेऊयात...
तत्पूर्वी चुकीची फेरफार नोंद (Ferfar Nond) म्हणजे काय, हे पाहुयात.... जमिनीच्या मालकी किंवा हक्कांमध्ये बदल झाल्यावर, तलाठी किंवा इतर सक्षम अधिकाऱ्याने केलेल्या नोंदीमध्ये काहीतरी चूक असणे. या चुकीच्या नोंदीमुळे, जमिनीच्या मालकाला किंवा इतर संबंधितांना अडचणी येऊ शकतात, जसे की पीक कर्ज मिळण्यास किंवा जमिनीच्या व्यवहारांमध्ये अडचणी येणे.
अशावेळी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५० (६) नुसार महसूल अधिकारी किंवा एसबीएम तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सहकारण हा अर्ज वकिलांमार्फत करू शकतात. त्याचं म्हणणं, तुमची कारणांमध्ये तथ्य असल्यास अर्ज स्वीकारून तुमचा जुना फेरफार रद्द करू शकतात.
कलम १५० (६) काय आहे? कलम १५० (६) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चा भाग आहे. या कलमामध्ये, फेरफार नोंदवहीतील नोंदी प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन केले आहे. फेरफार नोंदवहीतील नोंदी तपासल्या जातील आणि त्या बरोबर आढळल्यास किंवा दुरुस्ती केल्यानंतर, मंडल अधिकारी किंवा भू-मापन अधिकारी प्रमाणित करेल.
कलम २५१ नुसार देखील अर्ज करू शकतात.. शिवाय महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २५१ नुसार देखील अर्ज करू शकतात. 'एखाद्या व्यक्तीने कायदेशीर कार्यवाहीमध्ये खोटी ओळख वापरल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी आहे. याचा अर्थ, जर कोणी न्यायालयात किंवा इतर कायदेशीर प्रक्रियेदरम्यान स्वतःचे नाव, पत्ता किंवा इतर माहिती खोटी सांगितली, किंवा दुसरी व्यक्ती बनून वावरण्याचा प्रयत्न केला, तर ते या कलमाखाली गुन्हा ठरतो.