नाशिक : जिल्ह्यासाठी ३९ हजार मेट्रिक टन खताचा (Urea Fertilizer) साठा खरीप हंगामासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील ३१ हजार ६०० मेट्रिक टन साठा प्रत्यक्ष कृषी विभागाकडे उपलब्ध झाला आहे. त्याचे वाटपदेखील सुरू करण्यात आले आहे. मात्र शेतकरीच नव्हे, तर जिल्ह्यातील अनेक किरकोळ कृषी केंद्रांना युरिया खताचा पुरवठा होत नसल्याची ओरड होत आहे.
१२ हजार मेट्रिक टन इतका युरियाचा साठा मागील दहा ते बारा दिवसांमध्येच कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी युरिया मिळत नव्हते, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. खरीप हंगामातील लागवड जिल्ह्यात ७५ टक्के झाली आहे. दुसरीकडे खरीप हंगामपूर्व हजारो टन युरिया वाटपाचे काटेकोर नियोजन करूनही शेतकऱ्यांना गरजेनुसार युरिया उपलब्ध असल्याची ओरड होत आहे.
संरक्षित साठा ५,५०० मेट्रिक टन, टंचाईत उपयोगजिल्ह्यासाठी ४० हजार मेट्रिक टन खताचा साठा तर मिळणारच आहे. परंतु संरक्षित साठादेखील ५५०० मेट्रिक टन इतका शासनाकडून मिळणार आहे. याशिवाय रब्बी हंगामातील २७ हजार मेट्रिक टन खताचा साठा वापरता येईल. असा सर्व मिळून जवळपास ७२ हजार मेट्रिक टन इतका खताचा साठा जिल्ह्यासाठी असेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
रब्बी हंगामातील २७ हजार मेट्रिक टन स्टॉक कामीयंदा युरियाची कोणतीही टंचाई नसल्याची माहिती कृषी विकास अधिकारी एस. ए. शेवाळे यांनी दिली. खरिपासाठी ३९ हजार मेट्रिक टन युरिया असून त्याशिवाय २७ हजार मेट्रिक टन युरिया रब्बी हंगामातील शिल्लक होता. त्यामुळे युरिया उपलब्धता आहे, शेतकरी वर्गाने कृषी विक्रेत्यांना सांगून खरेदी करावी.
कापूस, मका, ऊस युरियाशिवाय व्यर्थजिल्ह्यात खरीप हंगामात साडेसहा लाख हेक्टरवर पिके घेण्यात येत असून, त्यातील ७० टक्के पीक सोयाबीन व मक्याचे घेतले जात आहे. मात्र, या दोन पिकांसह उसाला तर युरियाची गरज फार असते. कापूस, मका आणि ऊस यासारख्या पिकांना वाढीसाठी नायट्रोजन (जो युरियामध्ये असतो), फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म पोषक तत्त्वांची आवश्यकता असते.
नियुक्त १७ भरारी पथकांचा फायदा काय?युरिया भरपूर असला तरी टंचाई कशी काय?, मुद्दाम टंचाई दाखवून युरिया अव्वाच्या भावात विकला जातोय मग अशा काही कृषी विक्रेत्यांवर कारवाई करणार काय?, जिल्ह्यात कृषी विभागाने १७ भरारी पथके तयार केली आहेत. या पथकांचा मग काय फायदा, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.