Join us

Farmer Success Story : नैसर्गिक शेतीतून कमावले लाखो; खुशाल कल्याणकर यांची प्रेरणादायी कथा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 16:45 IST

Farmer Success Story : कमी खर्चात, रासायन मुक्त शेती करत एखाद्या शेतकऱ्याने लाखोंचा नफा मिळवला आहे, असे ऐकायला आले तर आश्चर्य वाटेल. पण पिंपळगाव महादेवचे खुशाल कल्याणकर यांनी हे शक्य करून दाखवले. केवळ ४० गुंठ्यात घेतलेल्या दुधी भोपळ्याचे पीक, नियोजनबद्ध करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

गोविंद टेकाळे

कमी खर्चात, रासायन मुक्त शेती करत एखाद्या शेतकऱ्याने लाखोंचा नफा मिळवला आहे, असे ऐकायला आले तर आश्चर्य वाटेल. पण पिंपळगाव महादेवचे खुशाल कल्याणकर यांनी हे शक्य करून दाखवले. केवळ ४० गुंठ्यात घेतलेल्या दुधी भोपळ्याचे पीक, नियोजनबद्ध करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. (Farmer Success Story)

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील प्रयोगशील शेतकरी खुशाल कल्याणकर (Khushal Kalyankar) यांनी पारंपरिक शेतीपद्धतींपासून वेगळा विचार करत दुधी भोपळा (Bottle Gourd) या भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड यशस्वीरित्या केली आहे.(Farmer Success Story)

केवळ ४० गुंठे क्षेत्रावर नैसर्गिक पद्धतीने शेती करून त्यांनी २ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले, आणि अशा प्रकारे इतर शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.(Farmer Success Story)

अर्धापूर तालुका कृषी विभागाचे सहायक कृषी अधिकारी सचिन स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेणखताचा योग्य वापर, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे अचूक नियोजन, आणि रोपांची अंतर ठेवून केलेली लागवड यामुळे कमी खर्चात भरघोस उत्पादन घेतले.

यशस्वी शेतीमागील महत्त्वाचे टप्पे

लागवड कालावधी : एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी ४० गुंठे क्षेत्रावर दुधी भोपळ्याची लागवड केली. 

लागवडीचे नियोजन: दोन बेडमध्ये १० फूट, रोपांमध्ये अडीच फूट अंतर होते.

पाणी व्यवस्थापन करताना ठिबक सिंचनाची निवड करुन पाणी दिले.

पिकाला फक्त शेणखताचा वापर केला. 

रासायनिक औषधांचा वापर केला नाही.

पिकाचे उत्पन्न २ जूनपासून सुरू झाले आहे.

नांदेड येथील बाजारपेठेत एक दिवस आड विक्री केली जाते, यातून सरासरी ३ हजार रुपये प्रतिदिन मिळतात.

दूधी  भोपळा उत्पन्न कालावधी हा २.५ ते ३ महिने आहे.

एकूण खर्च : ६ हजार रुपये आला.

या पिकातून अंदाजे उत्पन्न २ लाखापेक्षा जास्त येणे अपेक्षित आहे.

बहुपीक शेतीचा आदर्श

खुशाल कल्याणकर हे फक्त दुधी भोपळा शेतीपुरतेच मर्यादित नाहीत. त्यांच्या शेतात झेंडू, गुलाब, आंबा, फळझाडे यांची शेती आहे. त्यांनी शेतीत फुलशेती, फळबाग, सेंद्रिय शेती आणि जलसंधारण याचा सुंदर संगम साधलेला आहे. त्यांच्या या प्रयोगशीलतेमुळे आज अनेक शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. 

लांबलचक दुधी भोपळा

४० गुंठ्यासाठी शेणखत, बियाण्याचा खर्च असा जवळपास ६ हजार रुपये इतका झाला आहे. इतर पिकांच्या तुलनेत याचे उत्पन्न लवकर सुरू होते. शेतकरी याकडे वळत नाहीत. स्वादिष्ट आकर्षक लांबलचक दुधी भोपळा आहे. इतर शेतकऱ्यांनी अभ्यास करून याचे उत्पन्न घ्यावे.  - खुशाल कल्याणकर, शेतकरी 

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story: अपयशातून यशाकडे: सुभाष मुंडेंची प्रेरणादायी तूर कथा वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीनांदेड