Join us

Farmer ID : शेतकरी ओळखपत्र काढलं का? अशी करा नोंदणी, काय होणार फायदा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:38 IST

Farmer ID : यासाठी agristack या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे.

Farmer ID : भारत सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना (Agristak) राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. यासाठी www.mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. नोंदणी आणि ओळखपत्राबाबत जाणून घेऊयात... 

शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी या संकेतस्थळाचा www.mhfr.agristack.gov.in याचा वापर करता येईल. या संकेतस्थळावर करावयाच्या कार्यवाहीचे सादरीकरण दिले आहे. त्यानुसार या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक करावा. तसेच शेतकरी ओळख निर्माण करण्याची कार्यवाही मोठया प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार व प्रसार करावा, असे निर्देश दिले आहेत. 

शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताची आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच, भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव, नकाशे यांचा माहिती संच या बाबीचा समावेश यामध्ये असणार आहे. शेतकऱ्यांचा माहिती संच निर्माण करण्यासाठी मोहीम स्वरुपात शेतकरी माहिती संच निर्माण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र राज्याचा शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी स्वयं नोंदणी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे शेतकऱ्यांना स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करता येईल. 

अशी करा नोंदणी सर्वप्रथम https://mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या. पहिल्या विंडोत आपल्यासमोर ॲग्रीस्टॅक हे पेज ओपन होईल. यातील Farmer Registry यावर क्लिक करा. यानंतर थेट नोंदणीचा पर्याय आपल्यासमोर दिसेल. यात Official आणि Farmer असे दोन पर्याय दिसतील यातील farmer यावर क्लिक करा. यानंतर खाली Create New user Account यावर क्लिक करा. पुढील विंडोमध्ये आपला नंबर टाकून सबमिट या बटनावर क्लिक करून नोंदणी करा. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरी