Join us

Fake Fertilizer : परवाना नाही, बिल नाही; कृषी विभागाने अवैध खत-औषध विक्री विरोधात केली मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 10:46 IST

Fake Fertilizer : सातारा येथे कृषी विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत संभाजीनगरच्या एका खत उत्पादक कंपनीची विनापरवाना विक्री उघडकीस आणली आहे. वाचा सविस्तर (Fake Fertilizer)

Fake Fertilizer : सातारा येथे कृषी विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत संभाजीनगरच्या एका खत उत्पादक कंपनीची विनापरवाना विक्री उघडकीस आणली आहे.(Fake Fertilizer)

बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केल्यानंतर, १ लाख २३ हजार रुपयांचा खत व औषधींचा साठा जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.(Fake Fertilizer)

सातारा जिल्ह्यात कृषी विभागाने मोठी कारवाई करत, संभाजीनगर जिल्ह्यातील एका खत उत्पादक कंपनीच्या विनापरवाना विक्रीचे जाळे उध्वस्त केले आहे. या कारवाईत १ लाख २३ हजार ४९० रुपयांचा खत व औषधींचा साठा जप्त करण्यात आला असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Fake Fertilizer)

आरोपींची नावे

या प्रकरणात कडू एकनाथ अधाने (रा. पिंपळगाव दिवशी, ता. गंगापूर) आणि गणेश चंद्रभान साळुंखे (रा. रायपूर, ता. गंगापूर) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

कारवाईची पार्श्वभूमी

छत्रपती संभाजीनगर येथील 'जीएस ॲग्रो' ही खत उत्पादक कंपनी परवाना न घेता सातारा जिल्ह्यातील शिवथर, तडवळे आणि सातारा शहरात खत व औषधी विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.

ही माहिती मिळताच जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे आणि गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी युवराज काटे यांनी अजिंठा चौक येथे सापळा रचला.

बनावट ग्राहकाने फोडला भांडाफोड

दुपारच्या सुमारास संशयित गाडी चौकात आल्यावर, बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. तपासात गाडीत 'जीएस अॅग्रो' कंपनीची विविध प्रकारची खते व औषधी असल्याचे आढळले. यानंतर संपूर्ण माल जप्त करण्यात आला.

जप्त केलेला माल

विविध प्रकारची रासायनिक खते

कीटकनाशके व इतर कृषी औषधे

एकूण किंमत: १,२३,४९०

पुढील कारवाई

या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात विनापरवाना विक्री आणि बिल न देता विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना विनापरवाना विक्री होणाऱ्या उत्पादनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Fertilizer Linking : अनुदानित खतांसोबत जबरदस्ती; सरकारी कंपन्यांचा ‘लिंकिंग’ फंडा उघड

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीखते