Join us

Sandalwood Farming : विदर्भात चंदन शेतीचा प्रयोग, गजाननरावांनी तीन एकरांत फुलवली साडे पाचशे झाडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:26 IST

Sandalwood Farming : अशातच शेतकरी गजानन होले यांनी चंदनाची शेती करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

- अमोल सोटे 

वर्धा : अलीकडच्या काळात शेतीत नवनवे प्रयोग होऊ लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने (Experimental Farming) योग्य नियोजनाच्या जोरावर कमी खर्चात अधिक नफा मिळवून देणारी शेती होत आहे. असाच काहीसा प्रयोग वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात यशस्वी केला आहे. जवळपास तीन एकर क्षेत्रावर चंदन शेती (Chandan Farming) उभी केली आहे. 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीत नवीन पीक घेण्याच्या पर्यंत करून जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर लहान आर्वी येथील गजानन होले यांनी तब्बल साडे पाचशे चंदनाची झाडे (Sandalwood Farming) लावली. सोबतच प्रचंड मेहनत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते यशस्वी करून दाखवली. त्यामुळे तालुक्यात एक नवा आर्दश घालून दिला आहे. 

आष्टी तालुक्यातील लहान आर्वी हे गाव संत्रा उत्पादन आणि कांदा उत्पादनासाठी वर्धा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. लहान आर्वी हे गाव नागपूर विभागात कांद्याचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. अशातच येथील शेतकरी गजानन होले यांनी चंदनाची शेती करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शेतकरी होले यांनी त्यांच्या तीन एकर शेतात ५५० चंदनाचे झाडे लावली. लावलेल्या चंदनाच्या सर्व साडे पाचशे झाडांचे संगोपन केले. आज ती झाडे तीन वर्षे पूर्ण केले आहे. 

इतर शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श 

यावरून विदर्भातही चंदन शेती होऊ शकते हे शेतकरी गजानन होले यांनी सिद्ध गजानन होले यांनी चंदनाची शेती करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शेतकरी होले यांनी त्यांच्या तीन एकर शेतात ५५० चंदनाचे झाडे लावली. लावलेल्या चंदनाच्या सर्व साडे पाचशे झाडांचे संगोपन केले. आज ती झाडे तीन वर्षे पूर्ण केले आहे. यावरून विदर्भातही चंदन शेती होऊ शकते हे शेतकरी गजानन होले यांनी सिद्ध करून दाखविले. लाखो रुपयांची चंदनाची शेती तयार झाल्याने गजानन यांनी इतरही शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श घालून दिला आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीवर्धाशेतकरी