प्रमोद मुरूमकार
अकोला जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी आणि कुस्तीगीर परिषदेचे सदस्य राजेंद्र गोतमारे यांनी शेतीत असा 'देशी जुगाड' लावला आहे की, पाहणारे थक्क झाले आहेत. टाकाऊ वस्तूंनी त्यांनी तयार केलेले डवरणीसह खत टाकणारे यंत्र कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी श्रमात शेतीचे काम सोपे करत आहे.(Desi Jugaad)
जिथं इच्छाशक्ती आणि कल्पकता असते, तिथं साधनांची कमतरता अडथळा ठरत नाही, याचे जिवंत उदाहरण ठरले आहेत अकोला जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य आणि प्रगतिशील शेतकरी पैलवान राजेंद्र गोतमारे. (Desi Jugaad)
कुस्तीच्या आखाड्यात ताकद आणि जिद्दीने नाव कमावलेले गोतमारे आता शेतीतही नावीन्यपूर्ण कल्पनांनी चर्चेत आले आहेत.(Desi Jugaad)
अकोला जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी आणि कुस्तीगीर परिषदेचे सदस्य राजेंद्र गोतमारे यांनी शेतीत असा 'देशी जुगाड' लावला आहे की, पाहणारे थक्क झाले आहेत. (Desi Jugaad)
टाकाऊ वस्तूंनी त्यांनी तयार केलेले डवरणीसह खत टाकणारे यंत्र कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी श्रमात शेतीचे काम सोपे करत आहे.(Desi Jugaad)
टाकाऊ वस्तूंमधून उपयुक्त यंत्राची निर्मिती
शेतीत डवरणी आणि खत टाकणे ही दोन स्वतंत्र कामे पारंपरिक पद्धतीने करावी लागत होती. यामुळे वेळ, मजूर आणि खर्च तिपटीने वाढत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी गोतमारे यांनी वापरात नसलेल्या, फेकून दिलेल्या टाकाऊ साहित्याचा वापर करून 'डवरणी + खत टाकणी' एकत्र करणारे देशी जुगाड यंत्र तयार केले.
हे यंत्र एकाच वेळी डवरणी करताना खतही टाकते. त्यामुळे श्रम, वेळ आणि मजुरांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो. त्याचा कार्यक्षम वापर पाहून परिसरातील शेतकरी थक्क झाले आहेत.
शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि प्रेरणा
गोतमारे यांच्या शेतातील या यंत्राची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शेजारच्या गावांतील शेतकरी त्यांच्या शेतात दाखल होत आहेत.
प्रत्यक्ष कार्यपद्धती पाहून अनेकांनी या कल्पकतेचे कौतुक केले आहे. काही शेतकरी स्वतःच्या शेतासाठी असेच यंत्र बनवण्याची तयारी करत आहेत. यामुळे परिसरात 'देशी जुगाड क्रांती' सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
कुस्तीतील मेहनत, शेतीतही तितकीच
कुस्तीप्रमाणेच शेतीतही मेहनत, जिद्द आणि कल्पकतेचा संगम साधणारे गोतमारे सांगतात, कुस्ती शिकवते संयम, सातत्य आणि परिश्रमाची कदर. शेतीत ह्याच गोष्टी वापरल्या तर चांगले उत्पादन आणि खर्च बचत सहज साधता येते.
त्यांच्या या उपक्रमामुळे शेतीतील नवकल्पनांना चालना मिळाली असून, अनेक शेतकऱ्यांना स्वतः चं यंत्र, स्वतः च्या कल्पनेतून तयार करण्याची प्रेरणा मिळाली आहे.