Crop Loan : हिंगोलीत खरीप पेरणी जवळपास पूर्णत्वाला आली असली तरी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पीककर्ज वाटपाला मात्र वेग मिळालेला नाही. आजपर्यंत केवळ ३२ टक्के कर्ज वाटप झाले असून उर्वरित शेतकरी बँकांच्या दारात हेलपाटे मारत आहेत. (Crop Loan)
बँकांच्या दिरंगाईमुळे शेतकरी खासगी सावकारांच्या कचाट्यात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. यावर प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी होत आहे. हिंगोली जिल्ह्यात खरीप पेरणी जवळपास पूर्णत्वास आली असली तरी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या पीककर्ज वाटपाला मात्र गती मिळालेली नाही. (Crop Loan)
आजपर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच कर्जवाटप झाले असून उर्वरित शेतकऱ्यांना अजूनही बँकांच्या दाराशी हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वीच बँकांना उद्दिष्टपूर्तीसाठी इशारा दिला होता, तरीही या प्रक्रियेला वेग मिळालेला नाही.(Crop Loan)
पीककर्ज वाटपाची स्थिती चिंताजनक
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी बँकांना ८७५ कोटी ९० लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत केवळ २८५ कोटी ३३ लाख रुपये वाटप करण्यात आले असून, तेही फक्त ३२.२० टक्केच आहे.
शेतकऱ्यांच्या मते, कागदपत्र तपासणीच्या नावाखाली अनेक बँका शेतकऱ्यांना वारंवार वेळा लावतात. परिणामी, बियाणे, खते, औषधे यासाठी खासगी सावकारांकडे अधिक व्याजाने कर्ज घ्यावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
बँकांमधील वाटपाचे चित्र
ग्रामीण बँकांनी सर्वाधिक ६९ टक्के वाटप करून आघाडी घेतली आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा क्रमांक लागतो, ज्यांनी ४५ टक्के वाटप केले. मात्र व्यापारी बँकांचे वाटप केवळ १५ टक्क्यांवरच थांबले आहे.
शेतकऱ्यांची मागणी
जर हीच स्थिती कायम राहिली तर खरीप हंगामावर याचा परिणाम होऊन शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलले जातील. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलून बँकांना उद्दिष्ट पूर्ण करण्यास भाग पाडावे, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाची आकडेवारी (₹ लाखांत)
बँक | उद्दिष्ट | वाटप | टक्केवारी |
---|---|---|---|
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक | १६,३२९ | ७,४२४.८३ | ४५.४७% |
व्यापारी बँका | ५२,९६२ | ८,१५६.५० | १५.४०% |
ग्रामीण बँका | १८,२९९ | १२,६३५.६२ | ६९.०५% |
एकूण/सरासरी | ८७,५९० | २८,५३३ | ३२.२१% |
शेतकरी सभासदांची स्थिती (बँकनिहाय)
बँक | शेतकरी सभासद | टक्केवारी |
---|---|---|
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक | १८,१७९ | ४५.४७% |
व्यापारी बँका | ६,७८७ | १५.४०% |
ग्रामीण बँका | १२,२०० | ६९.०५% |