Cotton Harvesting Machine : कापूसशेतीमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली मजुरी, मजुरांची टंचाई तसेच उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत.(Cotton Harvesting Machine)
या पार्श्वभूमीवर शेतीतील यांत्रिकीकरण ही काळाची गरज बनली असून, त्याच उद्देशाने अकोट तालुक्यातील कालवडी गावात कापूस वेचणी यंत्राचे यशस्वी प्रात्यक्षिक घेण्यात आले. हे प्रात्यक्षिक अरुण हिंगणकर यांच्या शेतात आयोजित करण्यात आले होते.(Cotton Harvesting Machine)
या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथील विषय विशेषज्ञ कुलदीप देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक नवीनचंद्र कायंदे, सहयोगी प्राध्यापक संजय काकडे, कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी अजित वासेकर तसेच बी. बी. गावंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.(Cotton Harvesting Machine)
प्रात्यक्षिकादरम्यान कापूस वेचणी यंत्राद्वारे कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी मजुरीत कापूस कसा वेचता येतो, याचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले.
यंत्राच्या कार्यपद्धती, क्षमतेसह त्याच्या देखभालीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.
या कार्यक्रमाला परिसरातील सुमारे २५० हून अधिक प्रगतिशील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जगन बगाडे, दिलीप ठाकरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष यंत्राद्वारे कापूस वेचणीचे निरीक्षण करत प्रश्नोत्तराद्वारे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात संदीप माळी आणि प्रवीण दुरतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस वेचणी यंत्राच्या तांत्रिक बाबींचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुग्रीव पवार, विक्रम मिसळ, वैभव जाधव, अजय तरडे आणि तुषार धोटे यांनी विशेष सहकार्य केले.
या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांमध्ये कापूस शेतीतील यांत्रिकीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात उत्पादन खर्च कमी करून नफा वाढविण्यास ही यंत्रे निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
Web Summary : A cotton harvesting machine demonstration in Akot showed farmers how to reduce labor costs and time. The event, attended by 250 farmers, highlighted the machine's efficiency and maintenance, fostering positive views about agricultural mechanization and increased profits.
Web Summary : अकोट में कपास कटाई मशीन के प्रदर्शन ने किसानों को श्रम लागत और समय कम करने का तरीका दिखाया। 250 किसानों की उपस्थिति में, मशीन की दक्षता और रखरखाव पर प्रकाश डाला गया, जिससे कृषि मशीनीकरण और बढ़े हुए मुनाफे के बारे में सकारात्मक दृष्टिकोण को बढ़ावा मिला।