Join us

Cotton Cultivation : कापूस लागवडीचे गणित बिघडले; बोंडे, रोगराई आणि महागाईचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:53 IST

Cotton Cultivation : जागतिक कापूस दिनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मुसळधार पावसामुळे चिंता पसरली आहे. यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, रोगराई व बोंडअळींमुळे कापसाच्या लागवडीचे गणित शेतकऱ्यांसाठी बिघडले आहे. बोंडे सडल्यामुळे काढणी खर्च वाढला असून कापसाचा भाव कोसळला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात आले आहे. (Cotton Cultivation)

Cotton Cultivation :  जागतिक कापूस दिन साजरा होत असताना, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, रोगराई व बोंडअळींमुळे कापसाच्या लागवडीचे गणित शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे बिघडले आहे. अनेक शेतकऱ्यांचे कापसाचे पीक नासाडीला गेले असून, काढणीचा खर्च वाढल्यामुळे नफा पुसटावला आहे. (Cotton Cultivation)

मजुरी महागली, भाव कोसळला

काढणीच्या हंगामात बोंडे सडल्यामुळे मजुरांकडून कापूस वेचणे कठीण झाले आहे. एक मजूर दिवसभरात केवळ दहा किलो कापूस वेचतो आणि त्यासाठी शेतकऱ्याला २०० रुपये मजुरी द्यावी लागते. परिणामी, प्रतिकिलो कापूस वेचण्याचा खर्च जवळपास २० रुपये होतो, तर बाजारभाव फक्त ४० रुपये प्रति किलो आहे. या परिस्थितीत मजुरीतच बटाई होते आणि शेतकऱ्यांना फारसा लाभ मिळत नाही.

पिकाचे क्षेत्र व उत्पादन कमी

जिल्ह्यात यंदाचे कापसाचे क्षेत्र व पेरणी या प्रमाणात घट झाली आहे. खालील आकडेवारीतून परिस्थिती स्पष्ट होते:

श्रेणीक्षेत्र (हेक्टर)
सरासरी क्षेत्र१,९७,६३९
प्रत्यक्ष पेरणी१,२९,८१०

खामगाव तालुका पूर्वी  'कॉटन बेल्ट' म्हणून ओळखला जात असे, परंतु गेल्या दशकात या ओळखीला धक्का लागला आहे. आज उत्पादन व बाजारभाव यांच्यातील विसंगतीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लागवडीचा खर्च वाढला, कापसाचा भाव घसरला

गेल्या काही वर्षांपासून बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते व मजुरी यांच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. तीन-चार वर्षांपूर्वी कापसाचा भाव प्रतिक्विंटल १२ हजार रुपये होता. मात्र आज शासन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना कवडीमोल दर देत असून, खासगी व्यापारी ओलाव्याचे कारण सांगून फक्त ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल खरेदी करत आहेत.

लागवड खर्च वाढतोय, भाव कोसळतोय, रोगराई व अतिवृष्टीमुळे पिकाची हानी होतेय. उत्पादनाचा खर्च भरून काही उरत नाही; मेहनत वाया जाते. - गजानन बोंबटकार, शेतकरी, खेर्डा.

कापसाच्या हंगामात उत्पन्न व खर्च यांच्यात तफावत वाढत चालली आहे. यंदाच्या अतिवृष्टी व रोगराईमुळे शेतकऱ्यांचा नुकसान मोठा आहे. सरकार व बाजारपेठेत सुधारणा न झाल्यास, कापसाच्या उत्पादनावर व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Chia Market Update : लागवडीचा हंगाम तोंडावर; चियाच्या दरात जोरदार उसळी वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton Farming Crisis: Rain, Pests, and Costs Hit Farmers Hard

Web Summary : Maharashtra's cotton farmers face a crisis due to heavy rains, pests, and rising cultivation costs. Low market prices and high labor expenses further diminish profits, threatening the region's cotton belt status and farmers' livelihoods.
टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीशेती