Cotton Cultivation : चालू खरीप हंगामात कापूस पिकाच्या पेरणीमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात कापसाचे एकूण पेरणीक्षेत्र ३.३५ टक्क्यांनी, तर महाराष्ट्रात ६.१२ टक्क्यांनी घटले आहे. (Cotton Cultivation)
अनेक राज्यांमध्ये थोडी वाढही दिसली असली, तरी कापूस पिकाच्या दरात सातत्याने असलेली अनिश्चितता, वाढलेला उत्पादन खर्च आणि घटलेली उत्पादकता यामुळे शेतकऱ्यांनी एरंडी, मका, मूग, सोयाबीन, तीळ यांसारख्या पर्यायी पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.(Cotton Cultivation)
देशातील एकूण कापूस उत्पादन आणि पेरणीक्षेत्र यात महाराष्ट्राचा वाटा एकतृतीयांश आहे. देशात कापसाचे सरासरी पेरणीक्षेत्र १२५ लाख हेक्टर, तर महाराष्ट्रात ४५ लाख हेक्टर आहे.(Cotton Cultivation)
मात्र, कापसाचे दर कायम दबावात राहत असल्याने, तसेच वाढता उत्पादन खर्च आणि घटती उत्पादकता व उत्पादन, यामुळे बहुतांश शेतकरी कापसाला पर्याय म्हणून इतर पिके घेत आहेत. (Cotton Cultivation)
गुजरातमध्ये एरंडी, भुईमूग, कुलथी व तीळ, तर मध्य प्रदेश व महाराष्ट्रात मूग, मका व सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले आहे.(Cotton Cultivation)
देशात एरंडीचे पेरणी क्षेत्र ६३.२० टक्क्यांनी वाढले असून, मूग १६.०८ टक्के, धान १३.४० टक्के, कुलथी १३.२४ टक्के, मका ८.४४ टक्के, तीळ ४.२८ टक्के, तर भुईमुगाचे पेरणी क्षेत्र एक टक्क्याने वाढले आहे. नायजर सीडचे पेरणी क्षेत्र ८७.१७ टक्क्यांनी घटले असून, रागी २२.७५ टक्के, तूर ८.१५ टक्के, उडीद ६.७५ टक्के व सूर्यफुलाचे पेरणीक्षेत्र ५.२४ टक्क्यांनी घटले आहे.(Cotton Cultivation)
आयात व परावलंबित्व वाढणार
पेरणी क्षेत्र घटल्याने त्या शेतमालाचे उत्पादन घटणार आहे. शेतमालाचा वापर व मागणी यातील तूट भरून काढण्यासाठी आयात केली जाणार आणि पुन्हा दर दबावात येणार आहे. सरकारच्या शेतमाल बाजारातील अवाजवी हस्तक्षेपामुळे समाधानकारक दर मिळाले नाहीत, तर पुन्हा पेरणी क्षेत्र व उत्पादन कमी होऊन आयात वाढणार. या दुष्टचक्रामुळे आयातीसोबतच देशाचे परावलंबित्व वाढणार आहे, अशी प्रतिक्रिया कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केली.
कापसाच्या राज्यनिहाय पेरणी
राज्य | सन २०२४-२५ | सन २०२५-२६ | घट/वाढ (%) |
---|---|---|---|
पंजाब | १.००० | १.२०० | २०.००% वाढ |
हरयाणा | ४.७५० | ४.००० | १५.७९% घट |
राजस्थान | ५.७५० | ६.४०० | ११.३०% वाढ |
गुजरात | २३.१५२ | २०.१६८ | १२.८९% घट |
महाराष्ट्र | ४०.४९२ | ३८.०१४ | ६.१२% घट |
मध्य प्रदेश | ५.८६३ | ४.९७३ | १५.१८% घट |
तेलंगणा | १६.४५८ | १७.५१८ | ६.४४% वाढ |
आंध्र प्रदेश | १.८६० | २.४२० | ३०.११% वाढ |
कर्नाटक | ६.४०५ | ७.४९९ | १७.०८% वाढ |
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीन दरात उसळी; जुन्या सोयाबीनला सोन्याचा भाव वाचा सविस्तर