करखेली (ता. धर्माबाद) : संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्पांतर्गत करखेली (ता. धर्माबाद) येथे 'शेती दिन' तसेच कापूस उत्पादन व बाजारपेठविषयक जागरूकता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. (Cotton Awareness Program)
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सुधारित कापूस उत्पादन तंत्रज्ञान, बाजारपेठेतील संधी तसेच शेतीतील विविध आव्हानांना वैज्ञानिक पद्धतीने कसे सामोरे जाता येईल, याबाबत मार्गदर्शन करणे हा होता.(Cotton Awareness Program)
कार्यक्रमास मागील वर्षीच्या विशेष कापूस प्रकल्पातील प्रगतिशील शेतकरी कांतराव निकलपुरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या शेतीतील अनुभव कथन करत यशस्वी कापूस लागवडीसाठी अवलंबलेल्या वैज्ञानिक पद्धती, नियोजनबद्ध शेती आणि शाश्वत तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांशी संवाद साधला. (Cotton Awareness Program)
अधिक उत्पादन व दर्जेदार कापूस मिळवण्यासाठी त्यांनी अवलंबलेल्या 'दादा लाड' पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.(Cotton Awareness Program)
कापूस बाजारपेठेची सद्यस्थिती, दर ठरवणारे घटक, कापसाच्या गुणवत्तेची तपासणी कशी केली जाते तसेच खरेदी प्रक्रिया याबाबत एल.बी. जिनिंग इंडस्ट्रीजचे राजकुमार पांडे यांनी माहितीपूर्ण सत्र घेतले.
गुणवत्तापूर्ण कापूस उत्पादन, योग्य वेळी विक्री आणि बाजारातील मागणी ओळखून व्यवहार केल्यास शेतकऱ्यांना चांगले दर मिळू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष कापूस प्रकल्पाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. कृष्णा गणपतराव अंभुरे यांनी तांत्रिक सत्रात मार्गदर्शन केले. त्यांनी सघन लागवड (Closer Spacing) तंत्रज्ञान, किड व रोग व्यवस्थापन, पिकांचे नियमित निरीक्षण आणि योग्य वेळी शिफारशीनुसार उपाययोजना करण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना सविस्तरपणे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढू शकते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. संतोष चव्हाण (फळविद्या विभाग) यांनी फळे व भाजीपाला लागवडीतील अडचणी, रोग-कीड व्यवस्थापन तसेच पीक विविधीकरणाचे महत्त्व यावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. केवळ एका पिकावर अवलंबून न राहता पूरक पिकांची लागवड केल्यास आर्थिक स्थैर्य मिळू शकते, असा सल्ला त्यांनी दिला.
'शेती दिन' या कार्यक्रमामुळे शेतकरी आणि वैज्ञानिक यांच्यात संवाद साधला गेला. सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान, बाजारपेठेचे अचूक मार्गदर्शन आणि तांत्रिक सल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात व नफ्यात वाढ होण्यासाठी या कार्यक्रमाने मोलाचे योगदान दिल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी नमूद केले.
हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : चुकीच्या स्लॉट बुकिंगमुळे कापूस विक्री खोळंबली वाचा सविस्तर
Web Summary : Karkheli hosted a 'Farming Day' focusing on improved cotton production techniques and market opportunities. Experts guided farmers on scientific methods, pest management, and crop diversification for increased yields and economic stability, emphasizing modern technology adoption.
Web Summary : करखेली में 'कृषि दिवस' का आयोजन किया गया, जिसमें बेहतर कपास उत्पादन तकनीक और बाजार के अवसरों पर ध्यान केंद्रित किया गया। विशेषज्ञों ने किसानों को वैज्ञानिक विधियों, कीट प्रबंधन और फसल विविधीकरण पर मार्गदर्शन दिया, जिससे उपज और आर्थिक स्थिरता बढ़े, आधुनिक तकनीक अपनाने पर जोर दिया गया।