नाशिक : गव्हाच्या पिकाची सोंगणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम मजुरांऐवजी शेतकरी हार्वेस्टरने करून घेत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गव्हाच्या पिकाची कापणी आणि मळणी करण्यासाठी मजुरांऐवजी हार्वेस्टर परवडत असून, शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैशांची बचत होत आहे. त्यामुळे शेतकरी आता यांत्रिकीकरणाला पसंती देऊ लागला आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटेसह परिसरात सर्वत्र रब्बी पिकांची काढणी, मळणीची लगबग सुरू आहे. गत काही वर्षापासून हार्वेस्टर मशीनच्या साह्याने गहू काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसत आहे. या पिकाची सोंगणी करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मजूर मिळाले तर सोंगणीसाठी मजुरीचे दर शेतकऱ्यांना देण्यास परवडत नाही. यामुळे या पिकाची सोंगणी मजुरांऐवजी शेतकरी हार्वेस्टरने करून घेत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
प्रति एकर हार्वेस्टरचा खर्च मजुरांच्या तुलनेत हार्वेस्टर परवडत असून शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैशांची बचत होत आहे. गहू पिकाची सोंगणी, बांधणी आणि मळणी हे काम करण्यासाठी मजुरांना जर चार दिवस लागत असतील तर हे काम हार्वेस्टर केवळ चार तासांत करते. या पिकाची सोंगणी आणि मळणी करण्यासाठी प्रति एकर हार्वेस्टरचा खर्च केवळ अडीच ते तीन हजार रुपये आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मजुरांऐवजी हार्वेस्टर परवडत आहे.
उन्हाच्या कडाक्यात गहू सोंगणी अवघडउन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून रखरखत्या उन्हात सध्या शेतकरी गव्हाची सोंगणी करत आहेत. मजूर मिळत नसल्याने शेतकरी आता यंत्राच्या साह्याने सोंगणी करत आहेत. सध्या शेती कामासाठी वाढीव मजुरी देऊन देखील मजूर मिळत नाहीत. परिणामी ग्रामीण भागात शेतकरी शेतात हार्वेस्टरचा वापर करून गहू काढणी केली जात आहे.
Web Summary : Farmers in Nashik are increasingly using harvesters for wheat harvesting due to labor shortages and cost-effectiveness. Harvesters complete the work in hours, costing around ₹2,500-₹3,000 per acre, saving time and money compared to manual labor which takes days. Rising heat also motivates farmers toward machines.
Web Summary : नाशिक में किसान मजदूरों की कमी और लागत के कारण गेहूं कटाई के लिए हार्वेस्टर का उपयोग कर रहे हैं। हार्वेस्टर कुछ घंटों में काम पूरा कर देता है, जिसकी लागत लगभग ₹2,500-₹3,000 प्रति एकड़ है, जिससे समय और पैसे की बचत होती है। बढ़ती गर्मी भी किसानों को मशीनों की ओर प्रेरित करती है।