Chia, Safflower Farming : रिसोड तालुक्यातील शेतकरी यंदाच्या रब्बी हंगामात पारंपरिक पिकांपेक्षा अपारंपरिक आणि बाजारात मागणी असलेल्या पिकांकडे वळताना दिसत आहेत.(Chia, Safflower Farming)
विशेषतः चिया सीड आणि करडई या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत रिसोड तालुक्यात या पिकांचे क्षेत्र सर्वाधिक असल्याचे चित्र समोर आले आहे.(Chia, Safflower Farming)
अद्यापही काही भागांत पेरणी सुरू असल्याने येत्या काही दिवसांत या पिकांच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.(Chia, Safflower Farming)
यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, दमदार पावसामुळे धरणे आणि प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.(Chia, Safflower Farming)
कृषी विभागाने रिसोड तालुक्यासाठी ३९,५६८.९५ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात ३ जानेवारीपर्यंत ३४,५१८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, उर्वरित भागातही पेरणी सुरू आहे.(Chia, Safflower Farming)
अपारंपरिक पिकांकडे वाढता कल
गहू आणि हरभरा ही पिके यंदाही रब्बी हंगामातील प्रमुख पिके असली, तरी अनेक शेतकरी चिया सीड आणि करडई या तुलनेने कमी खर्चात अधिक नफा देणाऱ्या पिकांकडे वळले आहेत.
बाजारात चिया सीडला वाढती मागणी, करडईला तेलबिया पिक म्हणून मिळणारे महत्त्व आणि तुलनेने कमी पाण्यात येणारी ही पिके असल्याने शेतकऱ्यांचा या पिकांकडे कल वाढत आहे.
गहू़-हरभऱ्याचे क्षेत्र सरासरीपेक्षा कमी
तालुक्यात गहू आणि हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र मोठे असले, तरी प्रत्यक्ष पेरणी मात्र सरासरीपेक्षा कमी झाली आहे.
गव्हाचे सरासरी क्षेत्र ८,२७५.३ हेक्टर असताना यंदा केवळ ५,६६० हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ३०,५२५.५ हेक्टर असताना २६,४६३ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. याउलट, चिया आणि करडई या पिकांचे सरासरी क्षेत्र कमी असतानाही प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात पेरणी झाल्याचे दिसून येत आहे.
मका-बाजरीला पूर्णपणे फाटा
चियासारख्या नावीन्यपूर्ण पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होत असताना, मका आणि बाजरीसारख्या पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे.
यंदा रिसोड तालुक्यात मका आणि बाजरीचे क्षेत्र निरंक असल्याची नोंद आहे. मात्र, रब्बी ज्वारीची ८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, पुढील काळात या पिकाच्या क्षेत्रातही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात रिसोड तालुक्यात तब्बल १,७६० हेक्टर क्षेत्रावर चिया सीडची, तर ४३८ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यात करडईची एकूण पेरणी ५९२ हेक्टर इतकी असताना त्यापैकी बहुतांश क्षेत्र एकट्या रिसोड तालुक्यात असल्याने हा तालुका या पिकांचा केंद्रबिंदू ठरत आहे.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या
बाजारातील मागणी, तुलनेने कमी उत्पादन खर्च आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेता चिया आणि करडई पिकांमधून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
बदलत्या हवामान परिस्थितीत आणि अनिश्चिततेच्या काळात रब्बी हंगामात अपारंपरिक पिकांकडे वळण्याचा रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांचा निर्णय इतर तालुक्यांसाठीही मार्गदर्शक ठरण्याची शक्यता आहे.
Web Summary : Farmers in Risod, Maharashtra, are shifting to chia and safflower cultivation during this Rabi season due to market demand and less water requirement. Chia cultivation is 1,760 hectares, while safflower is 438 hectares in Risod.
Web Summary : महाराष्ट्र के रिसोड में किसान बाजार की मांग और कम पानी की आवश्यकता के कारण इस रबी सीजन में चिया और कुसुम की खेती की ओर रुख कर रहे हैं। रिसोड में चिया की खेती 1,760 हेक्टेयर है, जबकि कुसुम की खेती 438 हेक्टेयर है।