Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bibba Research Project : भानखेडेचा गोडंबी उद्योग पोहोचला राज्यस्तरावर; संशोधन प्रकल्पाला मोठा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:55 IST

Bibba Research Project : चिखली तालुक्यातील भानखेडे येथील पारंपरिक गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योगावर आधारित संशोधन प्रकल्पाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामीण उद्योगाला नवी ओळख मिळाली आहे.(Bibba Research Project)

Bibba Research Project : चिखली तालुक्यातील भानखेडे येथील पारंपरिक गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योगावर आधारित संशोधन प्रकल्पाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.(Bibba Research Project)

चिखली येथील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी प्रमोद विश्वनाथ पंडीत यांनी सादर केलेला प्रकल्प राज्यस्तरीय 'आविष्कार' संशोधन स्पर्धेत महाराष्ट्रातील पहिल्या दहा प्रकल्पांमध्ये निवडला गेला आहे. (Bibba Research Project)

या यशामुळे स्थानिक पारंपरिक उद्योगाला राज्य पातळीवर ओळख मिळाली आहे.(Bibba Research Project)

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राज्यपालांच्या पुढाकारातून २००८ पासून 'आविष्कार' संशोधन स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. 

ही स्पर्धा दरवर्षी यूजी, पीजी आणि पीपीजी (पीएच.डी.) या तीन गटांमध्ये जिल्हा, विद्यापीठ आणि राज्य स्तरावर आयोजित केली जाते.

जिल्हा ते राज्यस्तरापर्यंत यशाची वाटचाल

अठराव्या 'आविष्कार' स्पर्धेत श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे संशोधक विद्यार्थी प्रमोद पंडीत यांनी डॉ. सुनीता महादेव कलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपीजी गटात संशोधन प्रकल्प सादर केला होता.

सुरुवातीला बुलढाणा जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांच्या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर ३० व ३१ डिसेंबर २०२५ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला. या यशाबद्दल त्यांना विद्यापीठ स्तरावर मानाचा समजला जाणारा 'कलरकोट' देऊन सन्मानित करण्यात आले.

यानंतर २८ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे आयोजित १८ व्या राज्यस्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धेत महाराष्ट्रातील २६ विद्यापीठांतील सुमारे ९१० संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रमोद पंडीत यांच्या संशोधन प्रकल्पाची महाराष्ट्रातील पहिल्या दहा प्रकल्पांमध्ये निवड झाली.

पारंपरिक उद्योगाचा अभ्यास

या संशोधन प्रकल्पात चिखली तालुक्यातील भानखेडे गावातील महिलांकडून पारंपरिक पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या बिब्बापासून गोडंबी तयार करण्याच्या प्रक्रिया उद्योगाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. 

या उद्योगाचे आर्थिक, सामाजिक आणि स्थानिक रोजगारनिर्मितीतील महत्त्व पश्चिम विदर्भाच्या संदर्भात संशोधनात मांडण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील लघुउद्योग महिलांसाठी रोजगाराचे महत्त्वाचे साधन ठरू शकतात, तसेच योग्य नियोजन व तंत्रज्ञानाच्या मदतीने या उद्योगांना अधिक चालना मिळू शकते, असे निष्कर्ष या संशोधनातून पुढे आले आहेत.

मार्गदर्शकांचे योगदान

या संशोधन कार्यासाठी डॉ. सुनीता कलाखे, डॉ. प्रदीप बारड तसेच भानखेडे येथील पोलीस पाटील मिलिंद इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्थानिक पारंपरिक उद्योगावर आधारित हा प्रकल्प राज्यस्तरावर पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

या यशामुळे केवळ संशोधक विद्यार्थ्याचा सन्मान वाढला नाही, तर भानखेडे येथील गोडंबी प्रक्रिया उद्योगालाही राज्यस्तरावर नवी ओळख मिळाली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Coffee farming in Melghat : विदर्भाचा अभिमान! 'या' डोंगराळ भागातील कॉफी देशभर प्रसिद्ध होणार; वाचा सविस्तर

अधिक वाचा : Soil Health Card : माती सांगेल शेतीचे गणित; तपासणीमुळे उत्पादन वाढ, खर्च कमी

English
हिंदी सारांश
Web Title : Bhan Khede's Godambi Industry Reaches State Level: Research Project Honored

Web Summary : A research project on Bhan Khede's traditional Godambi (Bibba) processing industry has gained state-level recognition. The project, presented by researcher Pramod Pandit, was selected among the top ten projects in Maharashtra at the 'Avishkar' research competition, boosting the local industry's profile.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती