Join us

यंत्रमाग उद्योगाला अतिरिक्त वीज पुरवठा, परंतु युनिट एक रुपयाप्रमाणे वीज दर सवलत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 3:06 PM

२७ एचपी खालील साध्या यंत्रमागांना प्रति युनिट १ रु. प्रमाणे 'विशेष अनुदान' वीज दर सवलत म्हणून देण्यात येणार आहे.

राज्यातील यंत्रमाग उद्योगासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयानुसार  २७ एचपी खालील साध्या यंत्रमागांना प्रति युनिट १ रु. प्रमाणे 'विशेष अनुदान' वीज दर सवलत म्हणून देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील यंत्रमाग उद्योगाला चालना मिळणार असल्याचे उद्योग क्षेत्रातून बोलले जात आहे. 

राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती शासनाने गठित केली होती. या समितीने यंत्रमागधारकांच्या समस्या, चर्चा व बैठकीद्वारे जाणून घेतल्या. तसेच प्रत्यक्ष भेटी देऊन अभ्यासपूर्ण अहवाल शासनास सादर केला. अहवालातील काही मुद्यांपैकी एक २७ एचपी खालील साध्या यंत्रमागांना प्रति युनिट १ रु. प्रमाणे 'विशेष अनुदान' वीज दर सवलत म्हणून देण्यात यावे. २७ एचपी ते २०१ एचपी या प्रवर्गातील यंत्रमागांना नवसंजीवनी देण्यासाठी अतिरिक्त रु. ०.७५ प्रति युनिट इतकी वीजदर सवलत देण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये समितीने शिफारस केल्याप्रमाणे १ रु. व ०.७५ पैसे वीज दर सवलत देण्यात मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यंत्रमागधारकांना अतिरिक्त वीज सवलत योजना लागू केल्याचा निर्णय घेतल्यामुळे समितीचे अध्यक्ष तसेच सर्व मंत्रीमंडळाचे अभिनंदन करून आभार मानले. यंत्रमाग व्यवसाय हे रोजगार देणारे क्षेत्र असून या वीजदर सवलतीमुळे यंत्रमागधारकांना दिलासा मिळणार आहे. 

योजनेचे निकष

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून सदर योजना राज्यातील सर्व यंत्रमागधारक यांना सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यास लागू राहील. यंत्रमागधारक ग्राहकांना वीजदर सवलत योजना महाराष्ट्रातील यंत्रमागधारक यांना वीजेच्या दरांमध्ये सवलत देण्याबाबत आहे. या योजनेत ज्या यंत्रमागधारकास यंत्रमाग चालवावयाचा आहे, त्यांना देण्यात येणारी विद्युत जोडणी ही फक्त यंत्रमाग चालविण्याकरिताच देण्यात येते. यात सवलत देण्यात आली आहे. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीभारनियमनशेतकरीगहू