Join us
Daily Top 2Weekly Top 5

आवळा प्रक्रिया व्यवसाय सुरु करायचा आहे, इथं मिळतंय संपूर्ण मार्गदर्शन, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:40 IST

Agriculture News :  तुम्हाला जर आवळा प्रक्रिया व्यवसाय सुरु करायचा आहे अन् त्याबाबतचे प्रशिक्षण हवे असल्यास एक सुवर्णसंधी आली आहे.

Agriculture News :  तुम्हाला जर आवळा प्रक्रिया व्यवसाय सुरु करायचा आहे अन् त्याबाबतचे प्रशिक्षण हवे असल्यास एक सुवर्णसंधी आली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्यावतीने आवळा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. 

कुठे आणि कधी आहे प्रशिक्षण? दिनांक  :  १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान (सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत)ठिकाण : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (अहिल्यानगर)प्रथम येणाऱ्या २५ जणांना प्राधान्य 

प्रशिक्षणात शिकविले जाणारे प्रक्रिया पदार्थआवळा कॅन्डी, आवळा गर साठवण, आवळा लोणचे, आवळा सरबत, आवळा सुपारी, आवळा मुरंबा, आवळा सिरप व स्क्वॅश आणि आवळा पावडर.

प्रशिक्षणात आणखी काही शिकविले जाणारे विषय

  • आवळा प्रक्रिया व्यवसाय कसा सुरु करावा?
  • अन्न व सुरक्षितता व मानके कायद्याची माहिती आणि प्रक्रिया उद्योगाची नोंदणी कशी करावी?
  • आवळा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी मशिनरी व त्यांची देखभाल कशी करावी?
  • आवळा पदार्थाचे पॅकेजींग आणि मार्केटींग कसे करावे?
  • आवळा प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या कोणत्या कर्ज योजना/अनुदान आहेत?
  • आवळा प्रक्रिया उद्योगातील अडचणी कोणकोणत्या आहेत? त्यावर उपाययोजना काय आहेत?
  • आवळा प्रक्रिया उद्योगाचे व्यवस्थापन कसे करावे?

 

म्हणजेच आवळा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान आणि मार्गदर्शन मिळणार आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाशी (02426) 243259 संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Start Amla Processing Business: Complete Guidance Available Here, Read Details

Web Summary : Amla processing training program offered by Mahatma Phule Agricultural University, Rahuri, from November 17-21. Learn candy, pickle, powder making, business setup, food safety, machinery, marketing, government schemes and management. Contact (02426) 243259 for details.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीविद्यापीठ