Join us
Daily Top 2Weekly Top 5

AI in Agriculture : शेतीत 'एआय'चा प्रभावी वापर; बदलत्या हवामानावर तंत्रज्ञानाचा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:46 IST

AI in Agriculture : राज्यातील शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर हवामान माहिती मिळावी यासाठी 'महावेध' प्रकल्पांतर्गत २,३२१ महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. आधुनिक एआय-आयओटी (AI-IOT) तंत्रज्ञानामुळे हवामानाचा अंदाज अधिक अचूक मिळणार असून, त्यामुळे शेतीतील जोखीम कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. (AI in Agriculture)

AI in Agriculture : बदलत्या हवामानामुळे शेतीतील अनिश्चितता वाढत असताना, राज्यातील शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर हवामान माहिती मिळावी यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. (AI in Agriculture)

केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात उभारण्यात येत असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी आतापर्यंत २ हजार ५८४ महसूल मंडळांपैकी २ हजार ३२१ मंडळांमध्ये ही केंद्रे कार्यान्वित झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. (AI in Agriculture)

ही केंद्रे 'महावेध' प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आली असून, यामुळे शेतकऱ्यांची शेती अधिक स्मार्ट आणि सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.(AI in Agriculture)

राज्यात एकूण २७ हजार ८५७ ग्रामपंचायती असून, केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विंडस (WINDS) प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरही स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. (AI in Agriculture)

या टप्प्यात २५ हजार ५२२ ग्रामपंचायतींमध्ये हवामान केंद्रे उभारली जाणार असून, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. (AI in Agriculture)

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

या प्रकल्पांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता (Computer Vision), रोबोटिक्स तसेच पूर्वानुमान विश्लेषण (Predictive Analytics) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. 

त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज, पावसाचे प्रमाण, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग यासारखी माहिती प्रत्यक्ष वेळेत उपलब्ध होणार आहे.

या माहितीचा उपयोग ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीटेक, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा आणि महा-डीबीटी यांसारखे महत्त्वाचे कृषी प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी केला जाणार आहे.

शेतीतील जोखीम कमी होणार

अकोला जिल्ह्यात सध्या ५२ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यरत असून, ५३४ ग्रामपंचायतींपैकी ४८३ ठिकाणी नवीन केंद्रांच्या स्थापनेसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना पेरणी, फवारणी, कापणी यासारख्या महत्त्वाच्या शेती कामांचे नियोजन अचूकपणे करता येणार आहे.

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर या केंद्रांमधून मिळणाऱ्या अचूक हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कृषी सल्ला मिळेल. परिणामी पीक नुकसान कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

हे ही वाचा सविस्तर : AI for Farmers : कोरडवाहूपासून स्मार्ट शेतीकडे; कृषी क्षेत्रात 'एआय'साठी ५०० कोटी वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : AI in Agriculture: Technology combats changing weather for farmers.

Web Summary : Maharashtra farmers gain access to real-time weather data via AI-powered automated centers. This initiative aims to minimize crop loss, improve planning, and boost agricultural productivity using modern technologies like IoT and drone.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती