गजानन मोहोड
पारंपरिक गुढीपाडव्याच्या सणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा 'तंत्रज्ञानाची गुढी' उभारून एक वेगळाच संदेश दिला.(AI Farming)
अनुराग यावलकर यांच्या संत्रा बागेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आयओटी (IoT) आधारित प्रात्यक्षिक प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून, हा उपक्रम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.(AI Farming)
गुढीपाडव्याला आधुनिकतेची जोड
भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. याच शुभदिनी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांनी परंपरेला जपत आधुनिकतेचा स्वीकार करत 'एआय गुढी' उभारली.
या उपक्रमातून शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.
एआय आणि आयओटी (IoT) चा वापर
हा प्रकल्प सीट्रस इस्टेट वरूड, कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यासाठी 'मॅप माय क्रॉप' (Map My Crop) या कंपनीचे तांत्रिक सहकार्य मिळाले आहे.
या प्रकल्पाअंतर्गत शेतात आयओटी उपकरणे बसवून पुढील बाबींवर लक्ष ठेवले जाणार आहे.
* हवामानातील बदलांचे निरीक्षण
* मातीतील आर्द्रता व पोषणतत्त्वांचे विश्लेषण
* पाण्याचे अचूक व्यवस्थापन
* पिकांच्या वाढीचे डिजिटल मॉनिटरिंग
४० शेतकऱ्यांचा सहभाग
या उपक्रमात एकूण ४० शेतकऱ्यांच्या शेतांवर एआय आधारित तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर माहिती मिळून उत्पादन वाढीस मदत होणार आहे.
उत्पादनवाढीस मदत
तज्ज्ञांच्या मते, एआय व IoT च्या मदतीने
* पिकांचे आरोग्य वेळेवर समजेल
* रोग व कीड नियंत्रण सुलभ होईल
* पाण्याचा अपव्यय टळेल
उत्पादनात वाढ होईल
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि IoT तंत्रज्ञानामुळे शेती अधिक शास्त्रशुद्ध आणि अचूक होईल. हवामान, माती आणि पाण्याबाबत योग्य माहिती मिळाल्यास उत्पादनात निश्चित वाढ होईल.- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
राज्यासाठी ठरणार आदर्श
वरूड तालुक्यात सुरू झालेला हा प्रयोग भविष्यात संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरण्याची शक्यता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक नफ्याची आणि टिकाऊ बनवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधत वरूडच्या शेतकऱ्यांनी 'तंत्रज्ञानाची गुढी' उभारून शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केली आहे. हा उपक्रम भविष्यात स्मार्ट शेतीकडे वाटचाल करणारा महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे.
अधिक वाचा : Agriculture Planning Tips : शेतकऱ्यांनो, संकटे आहेतच; 'या' पद्धतीने करा शेतीचं प्लॅनिंग
Web Summary : Farmers in Varud, Maharashtra, celebrate Gudi Padwa with an 'AI Gudi,' showcasing AI and IoT in agriculture. The project, involving 40 farmers, uses technology for weather monitoring, soil analysis, and precision water management, aiming to increase crop yields and promote smart farming.
Web Summary : महाराष्ट्र के वरुड़ में किसानों ने 'एआई गुड़ी' के साथ गुड़ी पड़वा मनाया, जो कृषि में एआई और आईओटी को दर्शाता है। 40 किसानों की भागीदारी वाला यह प्रोजेक्ट मौसम की निगरानी, मिट्टी विश्लेषण और सटीक जल प्रबंधन के लिए तकनीक का उपयोग करता है, जिसका उद्देश्य फसल की उपज बढ़ाना और स्मार्ट खेती को बढ़ावा देना है।