Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture Scheme : महाडीबीटीच्या योजनांचे अनुदान कशामुळे रखडले, किती शेतकऱ्यांचे अनुदान बाकी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:30 IST

MahaDBT Scheme : खरेदी केल्यानंतर त्याचे देयक सादर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणे आवश्यक असते.

Agriculture Scheme : शासनाच्या महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतीकामासाठी आधुनिक यंत्रे व अवजारे खरेदी करणाऱ्या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. 

जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी अंदाजे २० कोटी रुपये निधीची आवश्यकता असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून गेल्या काही महिन्यांपासून कृषी आयुक्तालयाकडे याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप हा निधी प्राप्त न झाल्याने सुमारे २० हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

यंदा जिल्ह्यात महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत तब्बल ५० हजारहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नियमानुसार, यंत्रे खरेदी केल्यानंतर त्याचे देयक सादर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणे आवश्यक असते. जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, मात्र निधी संपल्याने उर्वरित प्रक्रिया रखडली आहे. 

राज्यातही अशीच स्थितीअनुदान थकण्याचा हा प्रश्न केवल जिल्ह्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण राज्याची हीच स्थिती आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी यांत्रिकीकरणाचा निधी रखडलेला असल्याने राज्यभरातील शेतकरी त्रस्त आहेत. यंत्रांची खरेदी करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतलेल्या किंवा उसनवारी केलेल्या शेतकऱ्यांना आता व्याजाचा बोजा सहन करावा लागत आहे.

 

soyabean Market : सोयाबीनने MSP ओलांडली, या फेब्रुवारी महिन्यात क्विंटलला दर कसे राहतील?

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahadbt Agriculture Scheme: Grant delays frustrate farmers; funds awaited.

Web Summary : Thousands of farmers await Mahadbt scheme grants for farm equipment. ₹20 crore needed, requested from agriculture commissionerate. State-wide issue, farmers face interest burdens due to funding delays.
टॅग्स :कृषी योजना