Join us

शेतकऱ्यांनो, कोणी घरपोच खते पाठवत असेल, तर विश्वास ठेऊ नका, काय घडलं पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 21:04 IST

Agriculture News : शेतकऱ्यांना आवश्यक असणारी रासायनिक विविध खते ही केंद्र शासनामार्फत अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात.

नाशिक : शेतकऱ्यांना आवश्यक असणारी रासायनिक विविध खते ही केंद्र शासनामार्फत अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात. या खतांचे उत्पादन व विक्री परवानाधारक व्यक्तींनाच करता येते. 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे 10:26:26 या खताच्या बनावट बॅग तयार करून त्यात बोगस खते भरून घरपोच उपलब्‍ध करून देत असल्याची घटना उघडकीस आल्यामुळे पोलीस स्टेशन हरसूल येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांनी अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत उत्पादक/ विक्रेत्यांकडूनच पक्के बिल घेवून खते खरदी करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बहुतांश शेतकऱ्यांचा कल युरिया, डीएपी 10:26:26 यासारख्या ठराविक खतांच्या मागणीकडे आहे. केंद्र शासनाकडून पुरवठा होणारी अनुदानित खते ई पॉज प्रणालीद्वारे उत्पादकापासून ते वापर करण्याऱ्या शेतकऱ्यांपर्यत ऑनलाईन सिस्टिमद्वारे देण्यात येतात. या सनियंत्रित प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिकृत व योग्य गुणवत्तेची खते मिळतात. 

परंतु परवाना नसलेल्या व्यक्ती शेतकऱ्यांना जादा मागणी असणारी खते घरपोच मिळवून देण्यासाठी अमिष दाखवून बनावट खत विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अमिषाला बळी न पडता सावधानता बाळगावी, असेही आवाहन विभागीय कृषी सहसंचालक काटकर यांनी केले आहे.

हेही वाचा : Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमध्ये आठवडाभरात 176 रुपयांची घसरण, वाचा आजचे दर 

टॅग्स :खतेशेती क्षेत्रशेतीकेंद्र सरकारनाशिक