Join us

Agriculture News : कृषी विद्यापीठातील आचार्य पदवी प्रवेश प्रक्रिया सुरु, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:38 IST

Agriculture News : कृषी आचार्य पदवी अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Online Admission) सुरु आलेली आहे.

Agriculture News :  कृषी आचार्य पदवी अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Online Admission) दि. २९ नोव्हेंबर, २०२४ पासून सुरु आलेली आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाकडून आचार्य पदवी अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या प्रवेश परीक्षेतील गुणांच्या ७० टक्के गुण आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेतील ३० टक्के गुण विचारात घेऊन उमेदवारांची प्रवेश पात्रतां निश्चित करणाऱ्या कार्यपद्धती अवलंबण्यात येते. 

राज्यात चार कृषी विद्यापीठांमध्ये नऊ विद्याशाखांमध्ये आचार्य पदवी अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. यामध्ये कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, मत्स्यशास्त्र, अन्नतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी आणि काढणी पश्चात व्यवस्थापन हया विद्याशाखा आहेत. हया अभ्यासक्रमाची १८ महाविद्यालये आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत ६ अशी विद्यापीठनिहाय महाविद्यालयांची संख्या आहे. 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत काढणी पश्चात व्यवस्थापन हा नवीन आचार्य पदवी अभ्यासक्रम विविध पाच विषयांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु झालेला आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत आचार्य पदवी अभ्यासक्रमाची एकूण प्रवेश क्षमता २६४ विद्यार्थी प्रतीवर्ष अशी आहे. यानु‌सार संविधानिक जारक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किमान 6.4 सीजीपीए आणि खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किमान 6.5 सीजीपीए असे गुण अनिवार्य आहेत. उमेदवाराचे संशोधन लेख प्रसिद्ध झालेले असल्यास एक संशोधन लेखाकरता 0.05 गुणांचा अधिकार देण्यात येतो.

प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने... 

प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत https://phd.agrimcaer.in या संकेतस्थळावर प्रवेशोच्छुक उमेदवाराने नोंदणी करणे अनिवार्य. आहे. नोंदणी करतेवेळी उमेदवाराने वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अधिभार, प्रवर्गविषयक माहिती भरावयाची असून त्याच्याशी संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करावयाची आहेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज संकेतस्थळावर दाखल करण्याची मुदत दि.१० डिसेंबर, २०२४ पर्यंत आहे.

अंतरिम गुणवत्ता यादी... 

नियोजित वेळापत्रकानुसार अंतरिम गुणवत्ता यादी दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिध्द होणार आहे. याबाबत हरकती दाखल करण्यासाठी दि.१३ ते १६/ डिसेंबर २०२४ हा कालावधी देण्यात आला आहे. उमेदवारांच्या हरकती विचारात घेऊन दि.१८/१२/२०२४ रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

तीन प्रवेश फेऱ्या.... 

प्रवेश प्रक्रियेतर्गत तीन प्रवेश फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. उमेदवाराची गुणवत्ता आरक्षित प्रवर्ग आणि उमेदवाराने दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन प्रथम व द्वितीय प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. उर्वरित तिसरी प्रवेश फेरी संबंधित महाविद्यालय किंवा प्रवेश प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी दि.६ व ७ जानेवारी २०२५ रोजी राबविण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक व प्रवेश माहिती पुस्तिका https: phd agriuncaer in संकेतस्थळावर उपाय करून देण्यात आलेली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीविद्यापीठशिक्षण