Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृषी यांत्रिकीकरण योजना : महाडीबीटी पोर्टलवर पूर्वसंमती देणे बंद, काय आहे नेमकं कारण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:30 IST

Agriculture Scheme : महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती घटक ब्लॉक करून ठेवल्याने हजारो शेतकऱ्यांचे प्रस्ताव अडकून पडले आहेत. 

Agriculture Scheme :    कृषी विभागाने एक-दीड महिन्यापासून महाडीबीटी पोर्टल वरील पूर्वसंमती हा अत्यंत महत्त्वाचा घटक ब्लॉक करून ठेवल्याने राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे प्रस्ताव अडकून पडले आहेत. 

शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची वारंवार आवाहन केले जाते. परंतु त्यानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज केले, मात्र आता पुढील टप्प्यावरच प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकरी हातभार झाले आहेत. तसेच ते पूर्वसंमतीची वाट पाहत आहेत. 

सध्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर झाले असून कागदपत्रांची पूर्तता देखील झाली आहे शिवाय तपासणी देखील पूर्ण झाली आहे मात्र पूर्वसंमती न मिळाल्याने पुढील कोणतेही कार्यवाही झालेले नाही कारण ऑनलाईन पद्धतीने पूर्वसंमतीचा पर्याय बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी तर हतबल झालेच आहे, शिवाय कृषी अधिकारी हतबल झाले आहेत.

काय कारण आहे? तर कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध अवजारांची पूर्तता केली जाते. मात्र सद्यस्थितीत निधी अभावी पूर्व संमती बंद केल्या असल्याचं समजते आहे. अतिरिक्त दायित्व निर्माण होऊ नये, म्हणून सध्या पूर्वसंमती देणे बंद केले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

शेतकरी बांधवांसाठी आवाहन सद्यस्थितीत पूर्वसंमती बंद असल्याने शेतकरी बांधवांनी पूर्वसंमती आल्याशिवाय यंत्र खरेदी करू नये, कारण पुढे अनुदान अदा करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सद्यस्थितीत तरी शेतकऱ्यांनी पूर्व संमती मिळण्याची वाट पाहावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Agri Mechanization Scheme: Pre-approval Stopped on MahaDBT Portal; Reason?

Web Summary : Maharashtra's Agri department halted MahaDBT portal pre-approvals, stalling farmer applications due to fund shortage. Farmers are urged to await approval before purchasing equipment to avoid subsidy issues.
टॅग्स :कृषी योजनाशेतीशेती क्षेत्रशासन निर्णय