Join us
Daily Top 2Weekly Top 5

Aadhar Card Safety : तुमचं आधार कार्ड दुसरचं कोणी वापरत तर नाही ना? असं करा चेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:48 IST

Aadhar Card Safety : जर तुमच्या आधार कार्डवरून फिंगरप्रिंट्स किंवा आधार माहितीचा गैरवापर केला गेला तर?

Aadhar Card Safety : तुमचा आधार क्रमांक बँक, मोबाईल सिम, सरकारी योजना, कर्ज, सबसिडी अशा अनेक ठिकाणी दिला जातो... पण जर कोणी तुमच्या फिंगरप्रिंट्स किंवा आधार माहितीचा गैरवापर केला गेला तर? डिजिटल युगात ओळख चोरी ही मोठी समस्या बनत आहे.

आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत. तुमचे आधार कार्ड असुरक्षित होऊ नये म्हणून खालील खबरदारी घ्या

बायोमेट्रिक लॉक करण्यासाठी myAadhaar पोर्टल/ ॲप उघडा, आधार १ क्रमांक व ओटीपी टाकून लॉगिन करा.'बायोमेट्रिक लॉक/अनलॉक पर्याय निवडा लॉक कन्फर्म करा.

व्हच्र्युअल आयडी तयार करण्यासाठी

  • पर्याय १ : पोर्टल/ॲपवरून १६ अंकी व्हर्चुअल आयडी तयार करा.
  • पर्याय २ : एसएमएसद्वारे GVID आधार क्रमांकाचे शेवटचे ४ अंक हा संदेश ११४७ वर पाठवा.
  • महत्त्वाची माहिती : बायोमेट्रिक लॉक असताना, प्रत्येक वेळी प्रमाणीकरणासाठी आधी ते तात्पुरते अनलॉक करावे लागतात. आधार क्रमांकाऐवजी VID वापरता येतो, त्यामुळे मूळ आधार क्रमांक देण्याची गरज राहत नाही.
  • लक्षात ठेवा : आधार सुरक्षित ठेवणं म्हणजे तुमची ओळख, पैसा आणि प्रतिष्ठा सुरक्षित ठेवणं. 

 

  • अधिक माहितीसाठी जवळच्या आधार सेंटरला जाऊन भेट द्या... 
English
हिंदी सारांश
Web Title : Aadhar Card Safety: Secure Your Aadhar, Prevent Misuse Now!

Web Summary : Secure your Aadhar card by locking biometrics via the myAadhaar portal or app. Generate a virtual ID to avoid sharing your actual Aadhar number. Stay vigilant to protect your identity and financial security.
टॅग्स :आधार कार्डशेती क्षेत्रशेतीकृषी योजना