Join us

Grampanchayat Dakhale : ग्रामपंचायतीमधून कोणकोणते दाखले मिळतात, दाखल्यांची फी किती असते? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:00 IST

Grampanchayat Dakhale : जन्म दाखल्यापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत, विविध स्वरूपाचे दाखले मिळत असतात. आता हे दाखले कोणकोणते आणि याची फी किती असते, ते पाहुयात... 

Grampanchayat Dakhale :  आजकाल जन्माला आलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक गोष्टीला कागदपत्रांची गरज लागते. अशावेळी गावपातळीवर ग्रामपंचायत काम करत असते. ग्रामपंचायतीमधून अनेक दाखले मिळत असतात.

जन्म दाखल्यापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत, विविध स्वरूपाचे दाखले मिळत असतात. आता हे दाखले कोणकोणते आणि याची फी किती असते, ते पाहुयात... 

जन्म, मृत्यू, विवाह, रहिवाशी, ग्रामपंचायत येणे बाकी, शौचालय असल्याचा, नमुना 8 अ, विधवा, परित्यक्ता, विभक्त कुटुंबांचा दाखला हे सर्व दाखले प्रत्येकी 20 रुपयात मिळतात.

तसेच दारिद्रयरेषेखालील, हयातीचा, निराधार असल्याचा दाखला निःशुल्क दिला जातो. वरील दाखले वेळेत आणि विहित शुल्कात न मिळाल्यास नागरिक सहायक गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करू शकतात.

खाली दाखल्यांच्या यादीसह शुल्क किती असणार आहे, अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे 

 

टॅग्स :ग्राम पंचायतशेती क्षेत्रशेतीकृषी योजना